एक्स्प्लोर

पुण्यातील लॉकडाऊन व्यापाऱ्यांच्या दबावामुळे हटवला, अजित पवारांचा खुलासा

लॉकडाऊनमुळे लाखो कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न उभा ठाकला होता. मग हे उद्योग सुरु का केले जात नाहीत? असा प्रश्न विचारला जाऊ लागला, असं अजित पवारांनी म्हटलं.

पुणे : पुण्यातील लॉकडाऊन हे व्यापाऱ्यांच्या दबावामुळे हटवावा लागला असा खुलासा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी केला. पुण्यातील लॉकडाऊन तात्काळ हटवू नये अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची इच्छा होती, असं शिवसेनेनं म्हटलं होतं. "आम्ही स्वतः म्हणतोय लॉकडाऊन उठवा, मग तुम्ही का उठवत नाही." अशी मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांकडून मागणी होत होती. तसेच हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती बंद केली तेव्हा भाजीपाला मिळत नाही. अशी ओरड सुरु झाली. त्यावेळी ही आमच्यावर दबाव आला, असं अजित पवारांनी लॉकडाऊन उठवण्यामागचं कारण स्पष्ट केलं.

पुण्यात कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट झालाय. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी अनेक बैठका घेऊन ही परिस्थिती नियंत्रणात येताना दिसेना. अशातच कोट्यवधी खर्ची घालून, नव्यानं उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये पत्रकार पांडुरंग रायकर यांचं निधन झालं आणि आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा चव्हाट्यावर आला. म्हणून शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सूत्र हाती घेतली. गुरुवारी शरद पवार अचानक पिंपरी चिंचवड महापालिकेत पोहचले आणि आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या सोबतच्या बैठकीत दस्तुरखुद्द शरद पवार हजर राहिले होते. तब्बल पाच तास बैठकीचं सत्र सुरु होतं. जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर्स, लोकप्रतिनिधी आणि वृत्तपत्राच्या संपादकांसोबत चर्चा झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांवर प्रश्नांची सरबत्ती झाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची इच्छा नसताना पुण्यातील लॉकडाऊन का हटवण्यात आला? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. यावर आमची वेगवेगळी मतं होती हे अजित पवारांनी मान्य केलं. कोणत्या देशात काय सुरु झालंय याचे दाखले देत अनेकांनी कोरोनाच्या संकटासोबत जगायला हवं असं मत व्यक्त केलं. जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही तोवर कमी-अधिक प्रमाणात परिस्थिती अशीच कायम राहील, असं अनेक तज्ज्ञांनी सांगितलं. त्यातच पुण्यात चहुबाजुंनी औद्योगिक वसाहती विस्तारल्याचा मुद्दा समोर आणला गेला. पिंपरी चिंचवड तर उद्योग नगरी म्हणूनच ओळखली जाते. लाखो कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न उभा ठाकला होता. मग हे उद्योग सुरु का केले जात नाहीत? असा प्रश्न विचारला जाऊ लागला.

याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असता त्यांनी मुंबईप्रमाणेच पुण्यातील लॉकडाऊन टप्याटप्याने उठवावा असा सल्ला दिला. पण तितक्यात इथले अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि आमच्याकडे व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मागणी केली. "लॉकडाऊन उठवा असं आम्ही स्वतः म्हणतोय, मग तुम्ही का उठवत नाही" असा दबाव आमच्यावर टाकण्यात आला. त्यामुळे पुण्यातील लॉकडाऊन हा घाईघाईने अनलॉकच्या प्रक्रियेकडे वळला. असा खुलासा अजित पवारांनी केला. पण त्याचवेळी शाळा, महाविद्यालय, मॉल्स, थियेटर, रेल्वे यांसारख्या सुविधा अद्याप ही लॉकडाऊन आहेत याकडे बोट दाखवायला पवार विसरले नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
Solapur Crime News: पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या बायकोला आईनं दिली ऑफर; 39 लाखांची मागणी अन् आरोपातून मुक्तता..., सोलापुरात नेमकं काय घडलं?
पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या बायकोला आईनं दिली ऑफर; 39 लाखांची मागणी अन् आरोपातून मुक्तता..., सोलापुरात नेमकं काय घडलं?
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
Embed widget