एक्स्प्लोर

आरबीआयचा मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला दणका, व्यवहारावर निर्बंध, राज्यात खळबळ

आरबीआयकडून (RBI) मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या (malkapur urban cooperative bank) व्यवहारावर निर्बंध आणले आहेत. पुढील 6 महिन्यांपर्यंत निर्बंध आणत असल्याचे परिपत्रक जारी करण्यात आलं आहे 

मुंबई :  आरबीआयकडून (RBI) मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या (malkapur urban cooperative bank) व्यवहारावर निर्बंध आणले आहेत. बॅंकेची आर्थिक स्थिती खराब होत असल्याने ग्राहकांना खात्याकडून 10 हजारांहून अधिकची रक्कम काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हे निर्बंध सेविंग आणि करंट खात्यांसाठी लागू आहे. रिझर्व बॅंकेकडून मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या व्यवहारावर पुढील 6 महिन्यांपर्यंत निर्बंध आणत असल्याचे परिपत्रक जारी करण्यात आलं आहे 

परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, आरबीआयच्या पूर्व मंजुरीशिवाय बॅंक कोणतेही लोन रिन्यू करणार नाही. तसेच कोणतीही गुंतवणूक करणार नाही. कुणाकडूनही उधार घेणे किंवा नवीन ठेवी स्विकारणार नाही, कोणतीही मालमत्ता विकण्यासही निर्बंध घालण्यात आले आहेत. 


आरबीआयचा मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला दणका, व्यवहारावर निर्बंध, राज्यात खळबळ

बॅंकेच्या व्यवहारांवर निर्बंध नाही किंवा बॅंकेचे लायसन्स रद्द केले असे देखील नाही, मात्र बॅंकेने आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. 

याआधी देखील बॅंकेला केवायसी संदर्भात 2 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.  मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक 1 हजार कोटी रुपयांची ठेवी असणारी बॅंक आहे. भाजपचे आमदार चैनसुख संचेती बॅंकेच्या अध्यक्षपदी आहेत. 

पुणे, औरंगाबाद, नागपूर, वर्धा, अकोला, जळगाव, भुसावळ, मेहकर, चिखली, भोकरदन, सिल्लोड, मुर्तिजापूर अशा अनेक ठिकाणी बॅंकेचं प्रस्थ आहे.

आमदार चैनसुख संचेती बॅंकेच्या अध्यक्षपदी

मलकापूर, पुणे, औरंगाबाद, नागपूर, वर्धा, अकोला, जळगाव, भुसावळ, मेहकर, चिखली, भोकरदन, सिल्लोड, मुर्तिजापूर मिळून एकूण 28 ब्रांच आहेत. हजार कोटींच्या वर ठेवी असलेली ही बॅंक आहे.  अधिकचे लोन दिल्याने बॅंकेची आर्थिक स्थिती खराब होत होती. अशात आणखी स्थिती खराब होऊ बॅंक बुडू नये यासाठी आरबीआयकडून निर्बंध घालण्यात आले आहेत.  आॅगस्ट 2021 मध्ये ग्राहकांचे केवायसी नाॅर्म्समध्ये गडबडी आढळल्याने बॅंकेला 2 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.  भाजपचे विदर्भातले मोठे नेते आणि मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती बॅंकेच्या अध्यक्षपदी आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोधHasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget