शेतकऱ्यांना घेऊन मुंबई जाम करु, सोयाबीन अरबी समुद्रात फेकू, रविकांत तुपकर आक्रमक, सरकारवर हल्लाबोल
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं जगणं सरकार मान्य करणार की नाही? आम्ही सोयाबीन अरबी समुद्रात फेकू पण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसह मुंबई जाम करु असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

Ravikant Tupkar : सध्या राज्यातील सोयाबीन (Soybean) उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण सरकारनं सोयाबीनची खरेदी बंद केली आहे. हमीभावानं सोयाबीन खरेदी करण्याची मुदत संपली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसह (Farmers) विविध शेतकरी संघटना, शेतकरी नेते आक्रमक होताना दिसत आहेत. शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला इशारा दिला आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं जगणं सरकार मान्य करणार की नाही? आम्ही सोयाबीन अरबी समुद्रात फेकू पण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसह मुंबई जाम करु असा इशारा तुपकरांनी दिलाय.
नेमकं काय म्हणाले रविकांत तुपकर?
सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. त्यात आता सरकारने सोयाबीन खरेदी बंद केली आहे. यामुळं शेतकरी आत्महत्याच्या उंबरठ्यावर जाऊ शकतो असे रविकांत तुपकर म्हणाले. आता सरकार शेतकऱ्यांचा संयम तुटायची वाट पाहत आहे का? असा सवाल देखील तुपकरांनी केला. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा जगणं सरकार मान्य करणार की नाही? असा सवाल देखील तुपकरांनी केला आहे. आम्ही सोयाबीन अरबी समुद्रात फेकू पण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसह मुंबई जाम करु असा इशारा तुपकरांनी दिला आहे.
हमीभावानुसार सोयाबीन खरेदीची मुदत संपल्याने शेतकरी चिंतेत
हमीभावानुसार सोयाबीन खरेदीची मुदत संपल्याने राज्यभरातील शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांजवळ अजूनही सोयाबीन शिल्लक आहे. मात्र खरेदीची मुदत संपल्यानंतर आता नेमके काय करावे? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. हाच मुद्दा घेऊन किसान सभेने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. केंद्र सरकारने सोयबीन खरेदीची मुदत पुन्हा वाढवावी आणि सोयबीन खरेदी सुरू करावी, अशी मागणी किसान सभेकडून केली जात आहे. तसे न केल्यास आम्ही राज्यभरात आंदोलन करून, अशा इशाराही किसान सभेने याआधीच दिलेला आहे. असे असताना आता सोयाबीनच्या खरेदीसाठी मुदतवाढ दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुढे काय होणार? असे विचारले जात आहे.
सध्या खुल्या बाजारात सोयाबीनचे दर 3800 ते 4000 रुपयापर्यंत घसरलेत. हमी केंद्रावर सोयाबीनला 4851 रुपये क्विंटलचा दर आहे. त्यामुळं या केंद्रावर शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. परंतु, अजूनही शेतकऱ्यांचे सोयाबीनची खरेदी बाकी आहे. शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत सोयाबीनची खरेदी करा अन्यथा प्रतिक्विंटल सोयाबीनसा 3000 रुपये द्या अशी मागणी देखील तुपकरांनी केली होती.
महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांना दिलासा दिल्यानंतर 24 तासातच खाद्यतेलांच्या किंमती वाढतात कशा? सर्वसामान्यांनी थोडी कळ सोसावी : रविकांत तुपकर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

