Uday Samant: '...तर मी राजकीय संन्यास घेईन', दसऱ्यादिवशी रत्नागिरीत हिंदु मुस्लिम समाजातील तणावावर उदय सामंत थेटच म्हणाले,..
विजयादशमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन मुस्लिम धर्मियातील काही समाज कंटकांनी अडविण्याचा प्रयत्न केल्यामुळे रत्नागिरीतील कणकवलीमध्ये आणि परिसरात संवेदनशील वातावरण तयार झाले होते.
Ratnagiri: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील कणकवलीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानंतर आता त्यावर पालकमंत्री उदय सामंतांनी प्रतिक्रीया दिली आहे. दसऱ्यादिवशी रत्नागिरीत झालेल्या हिंदू मुस्लिम तणावानंतर उदय सामंत यांनी जर मी मुस्लिम बांधवांशी बोललो असेन तर राजकीय संन्यास घेईन असे म्हणत माझ्या खात्याचा यात काहीही संबंध नसल्याचं सांगितलंय. ही वक्फ बोर्ड कार्यालयाला मंजूरी महाराष्ट्र शासनानं घेतल्याचं ते म्हणालेत. रत्नागिरीतील हिंदू मुस्लिम वादात मी कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला नसल्याचंही त्यांनी सांगितलं असून विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता हा वाद परत उफाळून येण्याची शक्यता आहे.
विजयादशमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन मुस्लिम धर्मियातील काही समाज कंटकांनी अडविण्याचा प्रयत्न केल्यामुळे रत्नागिरीतील कणकवलीमध्ये आणि परिसरात संवेदनशील वातावरण तयार झाले होते. दरम्यान, पालकमंत्री उदय सामंत यांनी या घटनेवर स्पष्टीकरण दिले असून मी मोहन भागवतांशीही बोललो असून मुस्लिम बांधवांना एकाबाजूने सहकार्य करतो असा गैरसमज पसरवू नका असेही सामंत म्हणाले.
काय म्हणाले उदय सामंत?
रत्नागिरीतील कणकवली परिसरात झालेला हिंदू मुस्लिम समाजातील तणावावर पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे . मी कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला नाही . राजमाता गोमाता करण्यात माझा खारीचा वाटा आहे . रत्नागिरीतील वक्स बोर्ड कार्यालय हे मी मंजूर केले नाही . माझ्या खात्याचा याच्याशी काही संबंध नाही . ही मंजुरी महाराष्ट्र शासनाने दिली आहे . वक्त बोर्ड रद्द करण्यासाठी कोणाला यायचं असेल तर मी फडणवीस यांच्याकडे घेऊन जाईन असं सामंत म्हणालेत .
...तर राजकीय संन्यास घेईन
23 मार्च 2023 रोजी हे बोर्ड मंजूर झालं होतं . विजयादशमी दिवशी झालेल्या या प्रकारानंतर माझे कोणाही मुस्लिम बांधवांशी बोलणे झाले असेल तर मी राजकीय संन्यास घेईन असं वक्तव्य सामंत यांनी केलंय . माझा सी डी आर कोणाशी बोलण्याबाबत सापडला तरीही मी राजकीय संन्यास घेईन . संघाच्या लोकांनी कुठेही मला बोलवा मी माझे बाजू मांडेन . मुस्लिम बांधव यांना मी एका बाजूने सहकार्य करतो असे उगाच पसरवू नका . असेही सामंत म्हणाले .
100 जणांवर गुन्हा, 40 जणांविरुद्ध तक्रार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काढलेल्या विजयादशमी पथसंचलनात घुसून मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी घोषणाबाजी केल्यानंतर त्याची प्रतिक्रिया काल मध्यरात्री उमटली. या प्रकरणात माजी नगरसेवक मुसा काझीसह (Musa Qazi) १०० जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. संचलनात घुसणाऱ्यांवर कारवाईची मागणी करणाऱ्या संतप्त हिंदू जमावातील ४० जणांविरुद्धही तक्रार दाखल करण्यात आली आहे.