Pune: धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार, पुण्यात रेल्वे स्टेशन परिसरातील घटना
Pune Crime: आरोपी हा पीडितेच्या कुटुंबियांचा चांगला ओळखीचा आहे. तो दररोज पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला भेटत होता. तर हा प्रकार झाल्यापासून तो बेपत्ता आहे.
Pune Crime: पुण्यातील बंडगार्डन पोलिस स्टेशनच्या हद्दीतअल्पवयीन मुलीवर भरदिवसा सार्वजनिक शौचालयात बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. शुक्रवारी (8 एप्रिल) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलीय. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईनं याप्रकरणी तक्रार दिली आहे. पुणे स्टेशन जवळील जनसेवा शौचालयात हा प्रकार घडलाय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही कुटुंबीयांसह पुणे स्टेशन परिसरातच राहण्यास असून साफसफाईची कामे करते. शुक्रवारी दुपारी ते सार्वजनिक शौचालयात गेले असता आरोपी ही तिच्यापाठोपाठ शौचालयात गेला. त्यानंतर तिला खाली पाडून तिच्यावर अत्याचार करून घटनास्थळावरून पळून गेला. दरम्यान, पीडित मुलीने हा सर्व प्रकार आईला सांगितला आणि त्यानंतर या प्रकरणाला वाचा फोडली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी मारवाडी नामक एका आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आरोपी हा पीडितेच्या कुटुंबियांचा चांगला ओळखीचा आहे. तो दररोज पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला भेटत होता. तर हा प्रकार झाल्यापासून तो बेपत्ता आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात चिंतेच वातावरण निर्माण झालं आहे. महिला आणि अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यातच पुण्यातील बंडगार्डन येथील घटनेने यात आणखी भर घातली आहे.
हे देखील वाचा-
- Nanded News : रेती घाटात आढळला संशयास्पद मृतदेह, नांदेडमधील बिलोली तालुक्यातील घटनेने खळबळ
- Kirit Somaiya : सोमय्या पिता-पुत्र आज पोलीस चौकशीला गैरहजर, वकिलांची माहिती; आयएनएस विक्रांत बचाव निधीप्रकरणी समन्स
- ‘मूल जन्माला घालायचंय, पतीला सोडा’ तुरुंगात जन्मठेप भोगत असलेल्या पतीच्या पॅरोलसाठी पत्नीचं अजब कारण!