एक्स्प्लोर
Advertisement
लातूरमध्ये गतिमंद मुलीवर परप्रांतीयाकडून बलात्कार
आरोपी हा उत्तर प्रदेशातील अलिगडचा राहणारा आहे. 24 वर्षीय आरोपी महंमद हा मिक्सर विकण्याचं काम करतो.
लातूर: शिरुरअनंतपाळ तालुक्यातील शिराळा वांजरवाडा गावात एका परप्रांतीयाने गतिमंद मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी महंमद कुरेशीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा उत्तर प्रदेशातील अलिगडचा राहणारा आहे. 24 वर्षीय आरोपी महंमद हा मिक्सर विकण्याचं काम करतो. घरात गतिमंद मुलगी एकटीच असल्याचं हेरत त्यानं बलात्कार केला. मुलीनं नातेवाईकांना ही घटना सांगितल्यावर शिरुर अनंतपाळ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
महंमद कुरेशी मिक्सर विकण्यासाठी शिराळा वांजरवाडा वस्तीवर आला होता. त्यावेळी त्याने पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश केला. घरी कोणी नसल्याचे पाहून या नराधमाने गतिमंद मुलीवर अत्याचार केला. यानंतर हा नराधम तिथून पळून गेला. हा सर्व प्रकार मुलीने नातेवाईकांना सांगितल्यानंतर, हे प्रकरण उजेडात आलं.
या घटनेची माहिती फोनवरुन सर्वत्र देण्यात आली. मग मिक्सर विकणाऱ्या तरुणास पकडण्यात आलं. आरोपीला पीडित मुलीसमोर आणलं असता, मुलीने त्याला ओळखलं. त्यानंतर आरोपीला शिरुर अनंतपाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.
हा घटनाक्रम इतक्या जलद झाला की आरोपीला तात्काळ बेड्या ठोकण्यात आल्या. दुपारी बाराच्या सुमारास आरोपीने कृत्य केलं. त्यानंतर एकच्या सुमारास मुलीने नातेवाईकांना माहिती दिली. मग आरोपीचा शोध घेण्यासाठी फोन आणि व्हॉट्सअपद्वारे मेसेज पाठवण्यात आले. दुपारी साडे तीनच्या आसपास नराधमास पकडण्यात आले. त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि तिथे त्याला अटक झाली. गुन्हा घडल्यानंतर लगेच माहिती दिल्याने, हा गुन्हा उघडकीस आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement