एक्स्प्लोर
Advertisement
शिवसेनेशी युती झाली तर ठीक, अन्यथा स्वबळावर : दानवे
पुणे : शिवसेनेशी युती झाली तर ठीक, अन्यथा स्वबळावर लढू, असे स्पष्ट संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले आहेत. शिवसेनेकडून सकारात्मक प्रस्तावाची वाट पाहत असल्याची माहितीही दानवेंनी दिली. रावसाहेब दानवे पुण्यात बोलत होते.
आमच्याकडून शिवसेनेला कोणतीही डेडलाईन देण्यात आलेली नाही, असा दावा रावसाहेब दानवेंनी केला. शिवसेनेशी युती झाली तर दोन्ही पक्ष एकत्रित लढू, अन्यथा स्वबळावर मुंबई महापालिका निवडणुकीत उतरु, असं स्पष्टीकरण दानवेंनी दिलं.
भाजपने शिवसेनेला 114 जागांचा प्रस्ताव दिला आहे. बदललेल्या परिस्थितीत आमची मागणी योग्य आहे. सेनेकडून कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे त्यांच्या सकारात्मक प्रस्तावाची वाट पाहत आहोत, असंही रावसाहेब दानवे म्हणाले. वक्तव्यांमुळे युतीतील चर्चेत अडसर यायला नको, असंही दानवेंनी बोलून दाखवलं
एखाद्या मोठ्या नेत्याच्या सोबतीने अनेक जण पक्षात प्रवेश करतात. त्यामुळे त्यांच्याबाबत शहानिशा करणं कठीण जातं. मात्र पक्षात आलेले लोक गुंड असतील तर त्यांना काढुन टाकू, पद-तिकिट देणार नाही, असं स्पष्टीकरणही दानवेंनी दिलं.
तिकीटवाटपाचा अधिकार फडणवीस-दानवेंना, बैठकीत निर्णय
रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक झाली होती. राज्यातील जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपाचे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना देण्यात आले.उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना स्वबळावर लढण्यास तयार राहण्याचे संकेत
दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना स्वबळावर लढण्यासाठी तयार राहण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. शाखा निहाय बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना याबाबतच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement