Ranjitsinh Disale : डिसले गुरुजींचा राजीनामा नामंजूर करणार? शिक्षण आयुक्त स्तरावरुन हालचाली
Ranjitsinh Disale : जागतिक पुरस्कार विजेत्या डिसले गुरुजींबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. कारवाईला वैतागून राजीनामा दिलेल्या डिसले गुरुजींचा राजीनामा परत घेण्याबाबत कारवाई सुरू झाल्याची माहिती आहे.
Ranjitsinh Disale Guruji News : आंतरराष्ट्रीय अवार्ड (Global Teacher Award) मिळालेल्या रणजितसिंह डिसले यांनी नुकतीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर शिक्षकाबाबत चुकीचं काम होऊ नये, अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले होते. यानंतर शिक्षण विभाग खडबडून जागा झाला असून आता जागतिक पुरस्कार विजेत्या डिसले गुरुजींबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. कारवाईला वैतागून राजीनामा दिलेल्या डिसले गुरुजींचा राजीनामा परत घेण्याबाबत कारवाई सुरू झाल्याची माहिती आहे. मात्र डिसले गुरुजींनी राजीनामा परत घेण्याऐवजी आता जिल्हा प्रशासन हा राजीनामा नामंजूर करणार असल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात शिक्षण आयुक्तांकडून जिल्हा मुख्याधिकाऱ्यांना लेखी सूचना आल्याचंही कळालं आहे. तर मुख्याधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना इथून पुढे बाहेर न बोलण्याच्या लेखी सूचना दिल्या असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकं काय झालं?
गेल्या आठवड्यातच डिसले यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर डिसले गुरुजी म्हणाले होते की, "मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर सर्व वस्तुस्थिती मांडली, त्यांच्यासमोर सर्व कागदपत्रं ठेवली. त्यावर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. या सर्व प्रकरणावर मी 8 ऑगस्टला भूमिका मांडणार आहे." तर आंतरराष्ट्रीय अवार्ड मिळालेल्या शिक्षकाबाबत चुकीचं काम होऊ नये, अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की, डिसले गुरुजी मला आणि मुख्यमंत्र्यांना भेटले. मुख्यमंत्र्यांनी डिसले यांचं म्हणणं ऐकूण घेतलं आहे. कुठल्याही परिस्थितीत आंतरराष्ट्रीय अवार्ड मिळालेल्या शिक्षकाबाबत चुकीचं काम होऊ नये त्यांना त्रास होऊ नये, याबाबत मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.
जागतिक पुरस्कार विजेते सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी राजीनामा दिला आहे. 6 जुलै रोजी रणजितसिंह डिसले यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्यासंदर्भातील पत्र शिक्षण विभागाकडे दिले आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नावलौकिक करणाऱ्या शिक्षकाला शासनाची नोकरी का सोडावी वाटली हा या निमित्ताने उपस्थित झालेला प्रश्न आहे. डिसले यांच्या राजीनाम्यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. ग्लोबल पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) हे 2017 ते 2020 या काळात गैरहजर असल्याची प्रशासनाची माहिती खोटी निघाल्यानंतर त्यांच्यावर (Disale Guruji)केलेला स्वत:चा पगार स्वत: काढल्याचा आरोपही खोटा असल्याचं समोर आलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या :
- डिसले गुरुजींनी स्वत:चा पगार स्वत:च काढल्याचा आरोपही खोटा; शासकीय अधिकाऱ्यांना स्वत:चा पगार काढता येतच नाही
- आंतरराष्ट्रीय अवार्ड मिळालेल्या शिक्षकाबाबत चुकीचं काम होऊ नये, डिसले गुरुजींच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचे निर्देश
- विज्ञान केंद्रात डिसले गैरहजर असल्याची प्रशासनाची माहिती चुकीची, ABP माझाकडून अहवालातील आरोपांची पडताळणी
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI