BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
Voter Identity Card List : मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास बंदी आहे. तसेच निवडणूक आयोगाने सांगितलेल्या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक पुरावा सोबत नेणं बंधनकारक आहे.

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार, 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होत आहे. ज्यांचे नाव महानगरपालिका मतदार यादीमध्ये आहे, त्यांना मतदान करण्याचा अधिकार आणि हक्क आहे. महानगरपालिका मतदार यादीमध्ये मतदाराचे नाव, यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक व मतदान केंद्राचे ठिकाण याबाबतची माहिती दर्शविणाऱ्या मतदार चिठ्ठ्यांचे वाटप घरोघरी करण्यात येत आहे.
या निवडणुकीत पात्र मतदारांना मतदान केंद्रावर मतदार छायाचित्र ओळखपत्र दाखवल्यानंतर मतदान करता येईल. जर एखाद्या पात्र मतदाराकडे मतदार छायाचित्र ओळखपत्र नसल्यास त्या व्यक्तीला राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निश्चित केलेल्या अन्य 11 प्रकारच्या ओळखीच्या पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा दाखवल्यानंतर मतदान करता येईल.
Mobile Ban At Voting Centre : मतदार केंद्रावर मोबाईल बंदी
मतदान केंद्रावर मतदाराला मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मतदाराला त्याचा मोबाईल केंद्राच्या बाहेर, स्वतःच्या जबाबदारीवर ठेवावा लागणार आहे
मतदान - गुरुवार, दिनांक 15 जानेवारी 2026
मतदानाची वेळ - सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत
Voter Identity Card List : मतदानासाठी ग्राह्य ओळखपत्रांची यादी (कोणतेही एक ओळखपत्र)
1. मतदान ओळखपत्र
2. पासपोर्ट
3. आधारकार्ड
4 ड्रायव्हिंग लायसन्स.
5. पॅन कार्ड
6. सरकारी कर्मचाऱ्यांचे फोटोसहित ओळखपत्र
7. राष्ट्रीयकृत बँक अथवा पोस्ट ऑफिसमधील खातेदाराचे फोटो असणारे पासबुक
8. सक्षम प्राधिकरणांनी दिलेले फोटोसहित अपंगत्वाचे प्रमाणपत्र
9. केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसहित कार्ड
10. फोटो असलेलं पेन्शन कार्ड
11. स्वातंत्र्य सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र





















