एक्स्प्लोर

संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग

संभाजीनगर शहरातील एकूण 1267 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून, यासाठी एकूण 5588 मतदान केंद्राध्यक्ष व पोलिंग अधिकारी (पोलिंग ऑफिसर क्रमांक 1 ते 3) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संभाजीनगर : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या (Election) प्रचाराची सांगता झाली असून आता मतदान प्रक्रिया आणि निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतदानासाठी मतदार आणि कार्यकर्ते जसे इच्छुक आहेत, तसेच प्रशासनही तयारीला लागले आहे. छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025–26 साठी बुधवार 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून ही प्रक्रिया निर्भीड, शांततापूर्ण व पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी महानगरपालिका प्रशासनातर्फे सर्वसमावेशक आणि काटेकोर तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी, मतदान केंद्र व मनुष्यबळ व्यवस्था निश्चित करण्यात येत आहे. 

संभाजीनगरमध्ये महापालिकेच्या 115 जागांसाठी निवडणूक होत असून सर्वाधिक उमेदवार आणि सर्वाधिक पक्ष मैदानात उतरलेली मराठवाड्यातील ही सर्वात मोठी महापालिका आहे. मुंबईनंतर सर्वाधिक उमेदवार असलेल्या या महापालिकेच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रसासन सज्ज झालं आहे. शहरातील एकूण 1267 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून, यासाठी एकूण 5588 मतदान केंद्राध्यक्ष व पोलिंग अधिकारी (पोलिंग ऑफिसर क्रमांक 1 ते 3) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले असून मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था देखील सज्ज ठेवण्यात आली आहे.

मतदार व उमेदवारांची संख्या

या निवडणुकीत एकूण 11,17,477 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तसेच, विविध राजकीय पक्ष व अपक्ष मिळून एकूण 859 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

वेबकास्टिंग व निवडणूक निरीक्षण

मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक व विश्वासार्ह राहावी यासाठी 537 मतदान केंद्रांवर मतदान कक्षाच्या आत व बाहेर वेबकास्टिंग कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याशिवाय निवडणूक कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी 173 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

स्ट्रॉंग रूम व मतमोजणी केंद्रे

मतदानानंतर ईव्हीएम यंत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी व मतमोजणीसाठी शहरात चार स्ट्रॉंग रूम व मतमोजणी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये पुढील ठिकाणांचा समावेश आहे:
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, उस्मानपुराशा, सकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, स्टेशन रोड, एस. एफ. एस. शाळा, जालना रोड गरवारे आयटी पार्क, चिकलठाणा एमआयडीसी

प्रशासनाचा संदेश

महानगरपालिका प्रशासनातर्फे मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनासह समन्वय साधण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget