एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच, राम मंदिर बनवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा : रामदेव बाबा
श्रीराम हे प्रत्येक नागरिकाचे पूर्वज आहेत. ते हिंदूंचे आणि मुस्लिमांचेही पूर्वज आहेत. मुस्लिम बांधव सौदी अरबमधून आलेले नाहीत. ते आपलेच बांधव आहेत. हिंदू आणि मुस्लिमांचे डीएनए एकच असल्याचंही रामदेव बाबा म्हणाले.
नांदेड : राम मंदिर बनवण्यासाठी सरकारने कायदा करावा किंवा जनतेनेच राम मंदिर बनवायला स्वत: सुरुवात करावी अशी प्रतिक्रिया योगगुरु रामदेव बाबा यांनी दिली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रामदेव बाबा नांदेडमध्ये आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
श्रीराम हे प्रत्येक नागरिकाचे पूर्वज आहेत. ते हिंदूंचे आणि मुस्लिमांचेही पूर्वज आहेत. मुस्लिम बांधव सौदी अरबमधून आलेले नाहीत. ते आपलेच बांधव आहेत. हिंदू आणि मुस्लिमांचे डीएनए एकच असल्याचंही रामदेव बाबा म्हणाले. हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच असून राम मंदिर बनवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा, असेही रामदेव बाबा म्हणाले.
राम मंदिर हा भारतीय जनतेच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. तो कोणताही राजकीय प्रश्न नाही. राम मंदिर होणारच आणि रामासारखे देशाचे चरित्रही बनेल, असा विश्वास बाबा रामदेव यांनी व्यक्त केला आहे.
राम मंदिर अयोध्येत उभारावे अशी आमची श्रद्धा आहे. राम मंदिर हे आम्ही मक्केत किंवा व्हॅटीकनसिटीमध्ये बांधा असं म्हणत नाही, असेही रामदेव बाबा यावेळी म्हणाले.
राम मंदिर उभारणीसाठी आता कोर्टात मुद्दा सुरु आहे. यासाठी मध्यस्थांची नियुक्ती केली आहे. मात्र त्यांच्याकडून काही होईल असे वाटत नाही, असेही रामदेव बाबा म्हणाले. त्यामुळे एकतर सरकारने यासाठी कायदा करावा अन्यथा लोकांनी स्वतःहून राम मंदिर बांधायला, सुरुवात करावी असे दोनच पर्याय आहे, असे रामदेव बाबा म्हणाले.
आस्था ही सर्वात मोठी असते. आस्थेवर आघात कधीच करू नये, असेही रामदेव बाबा म्हणाले. मात्र मला विश्वास आहे की, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात राम मंदिर निर्माण होईल सोबतच देशाचे चरित्र देखील रामासारखे होईल, असे रामदेव बाबा म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement