एक्स्प्लोर
मराठा क्रांती मोर्चा नव्हे, तर शांती मोर्चा; रामदास आठवलेंचे कौतुकोद्गार
नाशिक: ''मराठा समाजाच्या मोर्चाच मी कौतुक करतो, त्यांनी आयोजित केलेल्या मराठा क्रांती मोर्चाचं नाव मराठा क्रांती मोर्चा नाही, तर मराठा शांती मोर्चा हवं, शांतातेसाठी मोर्चा असल्याने आमचा त्याला विरोध नाही, त्यामुळे आम्ही प्रतिमोर्चे काढण्याचा प्रयत्न केलेला नाही,'' अशा शब्दात मराठा मोर्चांचे कौतुक केले.
तसेच त्यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या वक्तव्यावर आपले मत मांडले.''आपण बडोलेंना मी मंत्रीपदावर असेपर्यंत तुम्हाला राजीनामा देण्याची गरज नाही, तुमच्या अडचणी सोडावण्याचा आपण प्रयत्न करु,'' असे आठवले यावेळी म्हणाले.
राजकुमार बडोले यांनी औरंगाबादमधील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना कोपर्डीच्या नावाखाली जर अनुसुचित जातींच्या लोकांवर अन्याय होणार असेल, तर तो आम्ही सहन करणार नाही, प्रसंगी मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, अशी भूमिका मांडली होती. यावर आठवलेंनी त्यांना राजीनामा देण्याची गरज नसल्याचे सांगितले.
दरम्यान, तळेगाव पीड़ित मुलीला मुख्यमंत्री फंडमधून आर्थिक मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement