एक्स्प्लोर

राहुल गांधींची पंतप्रधान होण्याची संधी गेली, ते मोदींना कधीच हरवू शकणार नाहीत, रामदास आठवलेंचा दावा

 राहुल गांधी (Rahula Gandhi) नरेंद्र मोदींना कधीच हरवू शकणार नाहीत. त्यांची पंतप्रधान होण्याची संधी हुकली असल्याचे वक्तव्य  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं.

Ramdas Athawale on  Rahul Gandhi :  राहुल गांधी (Rahula Gandhi) नरेंद्र मोदींना कधीच हरवू शकणार नाहीत. त्यांची पंतप्रधान होण्याची संधी हुकली असल्याचे वक्तव्य  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं. राहुल गांधी मत चोरीच्या मुद्यावर एखाद्या शास्त्रज्ञाप्रमाणे बोलतात पण आयोगासमोर जात नाहीत असे आठवले म्हणाले.

शरद पवार यांना अडीच वर्षासाठी पंतप्रधानपद देण्याबाबत मी बोललो होतो

राहुल गांधींना त्याचवेळी पंतप्रधान होण्याची संधी होती. मी तेव्हा युपीएमध्ये असताना तात्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना दुसरी टर्म देण्यापूर्वी सोनिया गांधी यांना आपण तसेच सुचवलेही होते. मात्र, भविष्यात काँग्रेसला मोठे बहुमत मिळून राहुल गांधी पंतप्रधान होतील असे काँग्रेसला वाटत असल्याने त्यांची संधी गेली. आता ते कधीच नरेंद्र मोदी यांना हरवू शकणार नाहीत. त्यामुळं भविष्यात ते कधीही पंतप्रधान होणार नाहीत असा दावा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. त्यावेळी आपण शरद पवार यांनाही अडीच वर्षासाठी पंतप्रधानपद देण्याबाबत बोललो होतो. मात्र पवार हे सोनिया गांधी यांच्या परदेशी मुद्द्यावरून काँग्रेसमधून बाहेर पडले होते. पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन परदेशी मुद्द्याबाबतची भूमिका चुकीची होती असे सांगावे असेही आपण सुचवले होते. मात्र ते घडले नाही असा गौप्यस्फोटही आठवले यांनी केला आहे. 

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आमच्याकडे पुरेसे सत्ताबळ

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आमच्याकडे पुरेसे सत्ताबळ असून कोणताही धोका एनडीएला होणार नाही असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. जरी विरोधकांचा उमेदवार आंध्र प्रदेशचा असला तरी चंद्राबाबू नायडू यांचे एकही मत विरोधकांना मिळणार नाही असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपती होण्याची संधी मिळत असल्याने हा आपल्या राज्याचा बहुमान असल्याचे त्यांनी सांगितले. नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी फक्त गोंधळ घालून जनतेच्या पैशाची बरबादी केल्याची टीका करताना मत चोरी मुद्द्यावर राहुल गांधी शास्त्रज्ञासारखे बोलतात असा टोलाही लगावला. मात्र याबाबत निवडणूक आयोगाकडे जाऊन भूमिका मांडा म्हणल्यावर मात्र ते जात नाहीत असे आठवले यांनी सांगितले. निवडणूक आयोग स्वायत्त असून त्याच्यावर सरकारचेही नियंत्रण नसते, असे आठवले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या: 

Ramdas Athawale : एकमेकांवर आरोप करून महाराष्ट्र आपल्याला अशांत करायचाय का? यवतमधील तणावावरून राज्यमंत्री रामदास आठवलेंनी विरोधकांना सुनावलं

महत्त्वाच्या बातम्या

शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादीच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget