एक्स्प्लोर
व्यसनाधीतनेमुळे बलात्काराच्या संख्येत वाढ: रामदास आठवले
![व्यसनाधीतनेमुळे बलात्काराच्या संख्येत वाढ: रामदास आठवले Ramdas Athavles Statement On Reap Rate Increase व्यसनाधीतनेमुळे बलात्काराच्या संख्येत वाढ: रामदास आठवले](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/23052001/Ramdas-Athavale1-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पंढरपूर: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बलात्काराच्या घटनांसंदर्भात अजब तर्क लढवला आहे. व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढल्याने बलात्काराच्या संख्येत वाढ झाल्याचं वक्तव्य त्यांनी आकलूजमध्ये केलं.
यावेळी त्यांनी कोपर्डी प्रकरणावरून भाजप सरकारवरही निशाणा साधला. ''सरकार कोणतंही असलं, तरी दलितांवरील अत्याचार थांबले नाहीत. दलितांवरील अत्याचाराची मानसिकता बदलली पाहिजे, त्यासाठी समाजात सलोखा निर्माण होण्यासाठी प्रयत्न व्हावेत,'' असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दलितांवर अन्याय झाला, तेव्हा कधीही मराठा समाजाला टारगेट केलं नाही. त्यामुळे दलित-मराठा फूट निर्माण करणे कोणाच्याही हिताचं नसल्याचं त्यांनी रामदास आठवलेंनी स्पष्ट केलं.
मागसवर्गीय विद्यार्थ्यांची १००८ कोटींची शिष्यवृत्ती थकीत
दरम्यान, राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांची 1008 कोटी रूपयांची शिष्यवृती केंद्राकडे थकीत आहे. ही रक्कम तातडीने राज्य सरकारला देणार असल्याचे त्यांनी यावेळी सष्ट केलं.
तसेच शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याने जे विद्यार्थी ग्रुप करून भाड्याने राहत असतील, त्यांना अनुदानाची रक्कम देण्याचा प्रस्ताव असल्याची माहितीही आठवलेंनी यावेळी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
क्रीडा
आरोग्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)