एक्स्प्लोर

विनोद तावडे, पंकजा मुंडेंना राज्यसभेचं तिकिट मिळणार? भाजपकडून तीन नावांची चर्चा

Rajya Sabha : 27 फेब्रुवारी रोजी राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे. यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. यातील पाच जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे.

मुंबई : राज्यसभेच्या (Rajya Sabha) 56 जागांसाठीच्या निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने (Election Commission) सोमवारी जाहीर केलं. येत्या 27 फेब्रुवारी रोजी राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे. यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. यातील पाच जागा महायुतीच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवाराची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. राज्यातून विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. 

आगामी निवडणुका आणि जातीय समीकरण लक्षात घेत भाजप राज्य सभेसाठी उमेदवार देणार असल्याचं समजतेय. विनोद तावडे यांच्या रणनितीमुळे बिहारमध्ये भाजप पुन्हा सत्तेत आल्याने राज्यसभेसाठी तावडेंचे नाव आघाडीवर असल्याची सूत्रांची माहिती मिळाली आहे. याबाबत केंद्रीय नेतृत्व लवकरच  अंतिम निर्णय घेणार आहे. 

राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी विधानसभेतील आमदार मतदार असतात, मागील दोन वर्षांत राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. राज्यसभेचे खासदार निवडणूक देणाऱ्या आमदार इकडे तिकडे झाले आहेत.  त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत रंगत येणार आहे. महायुतीमध्ये तीन प्रमुख पक्ष आहेत. भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्याकडे आमदारांची संख्या महाविकास आघाडीपेक्षा जास्त आहे. संख्याबळाचा विचार करता महायुतीला पाच जागा मिळतील. तर महाविकास आघाडीला एकच जागा मिळेल.

राज्यातील सध्याची स्थिती काय ?

महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यामध्ये काँग्रेसची ताकद जास्त आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये भाजपचे आमदार आहेतच, त्याशिवाय शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या आमदारांचीही ताकद असेल. त्यामुळे कोण किती उमेदवार देणार? याची राजकीय चर्चा सुरु आहे. सध्या असलेल्या पक्षनिहाय आमदारांच्या संख्येवरुन महाराष्ट्रतील सह रिक्त जागापैकी महायुतीकडे पाच आणि महाविकासआघाडीचे एक जागा जाऊ शकते. 

महाराष्ट्रातील सहा खासदार निवृत्त - 

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या एकूण खासदारांमध्ये महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, व्ही. मुरलीधरन आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. त्यामुळे आता राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या या खासदारांना पुन्हा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळणार का? सध्या मोदी सरकारमध्ये सूक्ष्म लघुउद्योग खात्याची धुरा सांभाळणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं काय होणार? त्यांची राज्यसभेवर पुन्हा वर्णी लागणार की, पक्षाकडून लोकसभेचं तिकीट त्यांना मिळणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्रातून 2024 मध्ये कोणते खासदार निवृत्त होणार? 

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार प्रकाश जावडेकर
केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे
काँग्रेसचे खासदार कुमार केतकर
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई
भाजपचे खासदार व्ही. मुरलीधरन
राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण

आणखी  वाचा :

राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर, महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश, 27 फेब्रुवारीला मतदान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 जुलै 2024 : ABP MajhaTOP 25 : दिवसभरातील टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 July 2024 : ABP MajhaRahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
Embed widget