विधानपरिषद, महामंडळ की आणखी काही? शिवसेना पक्ष प्रवेशानंतर नेमकं काय म्हणाले राजन साळवी? विनायक राऊतांवरही हल्लाबोल
भाई (एकनाथ शिंदे) मुख्यमंत्री असताना मी त्यांच्यासोबत काही परिस्थितीमुळं जाऊ शकलो नाही याचं मला दुःख असल्याचे मत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राजन साळवी (Rajan Salvi) यांनी व्यक्त केलं.

Rajan Salvi : भाई (एकनाथ शिंदे) मुख्यमंत्री असताना मी त्यांच्यासोबत काही परिस्थितीमुळं जाऊ शकलो नाही याचं मला दुःख असल्याचे मत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी व्यक्त केलं. कोणी म्हणतं मला विधानपरिषद देणार, महामंडळ देणार, मला काही नको. मला सगळं मिळालं आहे असेही साळवी म्हणाले. एक लहान भाऊ तुमचा पाठीमागे राहिला होता असेही राजन साळवी म्हणाले.
आपल्या पक्षात आलो याचा आनंद
मी पक्ष सोडून आपल्या पक्षात येत आहे, याचा एक आनंद आहे. तुम्ही कुटुंबात सामावून घेतल याचाही मला आनंद असल्याचे मत 9 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा वाढदिवस होता. त्यादिवशी माझाही वाढदिवस होता. त्यादिवशी मी एकनाथ शिंदे यांना भेटून म्हणालो होतो की मला तुमच्या कुटुंबात यायचं आहे. एक लहान भाऊ तुमचा पाठीमागे राहिला होता असेही राजन साळवी म्हणाले.
माझ्या डोळ्यामध्ये अश्रू
2014 ला मला वाटलं होतं की मी मंत्री होईल. पण त्यावेळी विनायक राऊत यांनी दीपक केसरकर यांचं नावं पुढं केलं. त्यानंतर 2019 ला वाटलं आता मंत्री होईल तेव्हा उदय सामंत यांना मंत्री केलं, राजन साळवी तिथेचं राहील्याचे ते म्हणाले. माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. 38 वर्ष मी सेनेचा काम केलं. 3 टर्म आमदर राहिल्याचे साळवी म्हणाले. जनसामन्यातला मी आहे असं साळवी म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत विनायक राऊत आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी किरण सामंतांचं काम केलं
2024 चा पराभव जिव्हारी लगला आहे. विनायक राऊत यांना आम्ही शिवसैनिकांनी मोठं केल्याचे साळवी म्हणाले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत विनायक राऊत आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी किरण सामंत यांचा काम केलं, हे मी जाहीरपणे सांगतो असेही साळवी म्हणाले. उदयजी आपण पालकमंत्री आहात, योग्य विकास आपल्या जिल्ह्याचा होईल यासाठी आपण प्रयत्न करु असेही साळवी म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला आहे. यावेळी मंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत उपस्थित होते. त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:

























