एक्स्प्लोर
मोदींनीच घेतली मोदींची मुलाखत, राज ठाकरेंचा व्यंगचित्राद्वारे निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राद्वारे निशाणा साधला आहे. ही मुलाखत म्हणजे मोदींनीच मोदींची मुलाखत घेतल्यासारखे असल्याचे राज ठाकरेंनी आपल्या व्यंगचित्रात रेखाटले आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राद्वारे निशाणा साधला आहे. ही मुलाखत म्हणजे मोदींनीच मोदींची मुलाखत घेतल्यासारखे असल्याचे राज ठाकरेंनी आपल्या व्यंगचित्रात रेखाटले आहे.
2019 वर्षाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदींनी एएनआय या वृत्तसंस्थेला प्रदीर्घ मुलाखत दिली. यावेळी एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांच्या अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली. काळा पैसा, नोटाबंदी, जीएसटी, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीतील भाजपचा पराभव यासारख्या अनेक प्रश्नांवर मोदींनी यावेळी उत्तरं दिली. मात्र विरोधकांनी या मुलाखतीवर टिका केली आहे.
राज ठाकरे यांनी मोदी स्वतःच स्वतःची मुलाखत घेत असल्याचे व्यंगचित्रात दाखवले आहे. त्यांच्या मागे वेगवेगळ्या ठिकाणची मोदींची छायाचित्रे भिंतीवर लावल्याचे रेखाटले आहे. मुलाखत घेणारे मोदी मुलाखत देणाऱ्या मोदींना 'बोला काय विचारु?' असं विचारताना दिसत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
महाराष्ट्र
महाराष्ट्र
विश्व
Advertisement