एक्स्प्लोर
एकाच व्यासपीठावर राज ठाकरेंचा अजित पवारांवर निशाणा
पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पुण्यात पार पडला. या कार्यक्रमात राज ठाकरे आणि अजित पवार यांच्या भाषणांनी रंगत आली.
पुणे : गेल्या 60 वर्षातील सिंचनाचा पैसा कुठे गेला, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वॉटरकप स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात केला. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
60 साठ वर्षातील पाटबंधारे विभागात पैसा मुरला नसता, तर राज्याची पाणीपातळी कमी झाली नसती, असा टोलाही राज यांनी लगावला. त्यानंतर आलेल्या अजित पवार यांनी राज ठाकरे याचं नाव न घेता बोलघेवडे संबोधत त्यांना टोला लगावला.
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजवरच्या राजकीय कुरघोड्यांमुळे सिंचन, गावचा विकास झाला नसल्याचं उत्तर दिलं. त्यामुळे वॉटर कप स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात या राजकीय भाषणांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.
राज ठाकरे काय म्हणाले?
दोन्ही सरकारचे नेते इथे हजर आहेत. गेल्या 60 वर्षातला सिंचनाचा पैसे कुठे गेला? जर 60 वर्षात इरिगेशन विभागात पैसा मुरला नसता तर राज्याची पाणी पातळी कमी झाली नसती, असं म्हणत राज ठाकरे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांसमोर फटकेबाजी केली.
दरम्यान, राज यांनी श्रमदानाला यावं अशी मागणी उपस्थित लोकांनी केली. त्यावर राज यांनी मिश्किल टिप्पणी केली. मी नक्की श्रमदानाला येईल. कुदळ कशी मारायची मला माहिती आहे, फावडे कसं मारायचं हे मला शिकवाल, असं राज ठाकरे म्हणाले.
अजित पवार काय म्हणाले?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement