एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईसह राज्यभरात पावसाच्या सरी, बळीराजाही सुखावला!
मुंबई: मुंबईत काल संध्याकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. कल्याण, ठाणे, नवी मुंबई, रायगड परिसरातही पावसाची संततधार सुरू होती. रविवार असल्यानं मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यांवर गर्दी केली. मात्र तासाभराच्या पावसामुळे दादरचा हिंदमाता परिसर, किंग्स सर्कल, एनसी केळकर मार्ग, रानडे रोडवर पाणी साचलं आणि त्यामुळे काही वेळासाठी ट्रॅफिक जाम झालं. आज सकाळपासूनच मुंबईत पावसाच्या रिमझिम सरी सुरु आहेत.
दरम्यान काल तासाभराच्या पावसानं मुंबईत काही ठिकाणी पाणी साचलं. अजून मोठा पाऊस व्हायचा आहे. त्यावेळी मुंबईची तुंबापुरी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. मुंबईसह राज्याच्या विविध भागात पावसाला सुरुवात झाली आहे. उस्मानाबाद, बीड, पंढरपूर आणि जळगावमध्ये पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे.
उस्मानाबाद:
उस्मानाबादमध्ये तब्बल आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात झाली. वीजांच्या कडकडाटासह उस्मानाबादमध्ये पावसाने हजेरी लावली. बीडच्या माजलगावमध्येही पाऊस कोसळला.
सोलापूर:
पंढरपूरसह मंगळवेढा आणि बार्शीतही वरुणराजाची कृपा झाली आहे. पंढरपूर आणि मंगळवेढा परिसरात पाऊस बरसला. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता काहीशी दूर झाली.
जळगाव:
तर तिकडे जळगावच्या अनेक भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
राजकारण
पुणे
Advertisement