एक्स्प्लोर
मुंबई-गोवा हाययेवर भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
पोलादपूरच्या पार्ले गावाजवळ ट्रक आणि मिनीडोअर रिक्षा या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.

रायगड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाडनजीक आज भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून तर सात जण जखमी झाले आहेत. पोलादपूरच्या पार्ले गावाजवळ ट्रक आणि मिनीडोअर रिक्षा या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यात मुझफ्फर येलुकर, नीलम कांबळे, नमीबाई जाधव, सोहम जाधव या चौघांसह आणखी एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दशरथ सुतार, देवांश चाळके, अनिता गणपत पवार, इंदू तळेकर, गीता चाळके, रुद्र चव्हाण, संतोष कोळेक अशी जखमींची नावं आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















