Rahul Narwekar Press Conference : ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेला राहुल नार्वेकर देणार उत्तर, 5 वाजता विधानसभा अध्यक्ष मांडणार भूमिका!
Rahul Narwekar Press Conference : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी 10 जानेवारी 2024 रोजी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल दिला.
Rahul Narwekar Press Conference : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी 10 जानेवारी 2024 रोजी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल दिला. याविरोधात उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. आज उद्धव ठाकरे महापत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेत कोणते आरोप करणार? काय पुरावे सादर करणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अशातच आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही आपली भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर राहुल नार्वेकर पत्रकार परिषद घेणार आहेत.
आमदार अपात्रता निकाल प्रकरणानंतर उद्धव ठाकरे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली होती. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आजही याच विषयावर महापत्रकार परिषद (Maha Patrakar Parishad) घेणार आहेत. पण आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत (Uddhav Thackeray) कायदे पंडीतही उपस्थित असणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार? कोणते मुद्दे मांडणार? काय पुरावे देणार? याकडे सर्व राजकीय लोकांच्या नजरा लागल्या आहेत.
ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला उत्तर-
उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पत्रकार परिषदेतूनच उत्तर देणार आहेत. ठाकरेंची पत्रकार परिषद चार वाजता होणार आहे. त्यानंतर लगेच पाच वाजता राहुल नार्वेकर पत्रकार परिषद घेणार आहेत. विधान भवनात राहुल नार्वेकर यांची पत्रकार परिषद होणार आहे. ठाकरेंच्या आरोपाला नार्वेकर काय उत्तर देणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
10 जानेवारी रोजी राहुल नार्वेकरांनी नेमका निकाल काय दिला ?
महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटाबाबतचं निकालवाचन बुधवारी (10 जानेवारी) पार पडलं. एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्याचसोबत, शिंदे गटाच्या भरत गोगावले यांचा व्हिप अधिकृत ठरवत ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांचा व्हिप विधानसभा अध्यक्षांनी अवैध ठरवलाय. त्यामुळे या निकालात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळालाय. उद्धव ठाकरेंच्या मनात आलं म्हणून ते एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करू शकत नसल्याची टिप्पणी राहुल नार्वेकर यांनी केलीय. खरी शिवसेना शिंदेंचीच असल्यामुळे शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवत, ठाकरे गटाची आमदार अपात्र करण्याबाबतची याचिका फेटाळण्यात आलीय. सोबतच ठाकरे गटाचेही सर्व आमदार पात्र करण्यात आलंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आमदार अपात्र करण्याबाबतच्या दोन्ही गटाच्या याचिका फेटाळत, दोन्ही गटांतील कोणतेही आमदार अपात्र केले नाहीत. दरम्यान, या निकालानंतर आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांनी यापेक्षा वेगळा निकाल अपेक्षित नव्हता, तसेच न्यायाची अपेक्षा करणं चूक असल्याचं म्हटलंय. त्याचप्रमाणे यापुढची लढाई कायदेशीर मार्गाने लढणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिलीय. आणि निकालाबाबत बोलताना आदित्य ठाकरेंचे डोळे पाणावले. तसेच, निकालानंतर संजय राऊतांनी संताप व्यक्त करत एकनाथ शिंदे यांची औकात काय? असा सवाल केलाय. दरम्यान, निकालानंतर उद्धव ठाकरे गटाने काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केलाय. तर शिंदे गटाने मोठा जल्लोष केला. एकूणच, या निकालामुळे शिंदे सरकारला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट झालंय.