एक्स्प्लोर
राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावं, आम्ही स्थळ पाहू : रामदास आठवले
दलितांच्या घरी जाणाऱ्या राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावं. त्यासाठी गरज पडल्यास आम्ही त्यांच्यासाठी स्थळ पाहू" असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
![राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावं, आम्ही स्थळ पाहू : रामदास आठवले rahul gandhi should marry dalit girl says ramdas aathawale in akola latest marathi news updates राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावं, आम्ही स्थळ पाहू : रामदास आठवले](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/29154754/akola-ramdas-athawale-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अकोला : दलितांच्या घरी जाणाऱ्या राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावं. त्यासाठी गरज पडल्यास आम्ही त्यांच्यासाठी स्थळ पाहू" असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. शनिवारी अकोल्यात विविध कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.
तसंच बाहेर पावटा पिण्यापेक्षा तरुणांनी लष्करात जावून औषध म्हणून रम-ब्रांडी प्यावी, असं वादग्रस्त विधानही आठवलेंनी केलं आहे. याआधीही आठवले यांनी पुण्यात हेच वक्तव्य केलं होतं. या विधानानंतर त्यांच्यावर मोठी टीका झाली होती.
संजय राऊतांच्या राहूल गांधींसंदर्भातील वक्तव्यावरही आठवले यांनी भाष्य केलं. राहुल आता पप्पूही राहीले नाहीत आणि अप्पूही राहीले नाहीत. ते पक्षासाठी अधिक मेहनत घेत असल्याचे रामदास आठवले म्हणाले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
बातम्या
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)