एक्स्प्लोर

Rahul Bajaj: राहुल बजाज यांचं आयुष्य कारखाना आणि कामगारांसोबत, मी एका मित्राला मुकलो: शरद पवार

Rahul Bajaj: मी एका मित्राला मुकलो तर देश एका उद्योजकाला आणि राष्ट्राचा विचार करणाऱ्या व्यक्तीला मुकला अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी राहुल बजाज यांच्या निधनावर दिली आहे.

मुंबई: मुंबईत बसून कारखाना चालवायचा नाही असा निर्णय घेतल्यानंतर राहुल बजाज यांनी आपलं आयुष्य आकुर्डीतील कारखाना आणि कामगारांसोबत घालवलं. त्यांच्या निधनाने आपण एका मित्राला तर देश राष्ट्राचा विचार करणाऱ्या व्यक्तीला मुकला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दिली आहे. 

राहुल बजाज यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, राहुल बजाज यांनी पहिला निर्णय घेतला, तो म्हणजे मुंबईत बसून कारखाना चालवायचा नाही. त्यानंतर त्यांनी पुणे-पिंपरीत कामाला सुरुवात केली. राहुल बजाज हे एकमेव उद्योजक होते, ज्यांनी सबंध आयुष्य आकुर्डीतील कारखाना आणि कामगार यांच्यासोबत घालवलं. औरंगाबादला औद्योगिकरण वाढावं यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न होते. त्यावेळी राहुल बजाज यांनी फार मोठं योगदान दिलं. राज्य सरकार आणि राहुल बजाज यांनी मिळून सातारामध्येही छोटा कारखाना काढला होता. 

स्वातंत्र्यानंतर देशाची उभारणी करण्यात काही उद्योजगांचा वाटा होता. जेआरडी टाटा,  शंतनुराव किर्लोस्कर अशांच नाव घेता येईल. यानंतर दुसरी पिढी उद्योग क्षेत्रात पुढे आली. यामधे राहुल बजाज यांचं नाव घ्यावे लागेल. महात्मा गाधींशी वर्ध्यातील बजाज कुटुंबाचा संबंध आला. सुरुवातीस या बजाज कुटुंबाचा व्यवसाय कापसाच्या व्यापाराचा होता.  मात्र पुढच्या पिढीने वेगळा मार्ग निवडला. राहुल बजाज यांची कारखानदारी पुण्यातून सुरु झाली असं शरद पवार म्हणाले. 

शरद पवार पुढे म्हणाले की, राहुल बजाज हे वेगळे उद्योजक होते, आपलं मत स्पष्ट मांडत होते. कधी सरकारचे मुद्दे पटले नाहीत तर त्यांनी स्पष्ट मांडले. राहुल बजाज यांनी निवडेल त्या क्षेत्रात त्यांनी कर्तृत्व दाखवलं. स्पष्ट भूमिकेमुळे राष्ट्रीय पातळीवर उद्योग वाढवण्यासाठी मदत झाली. राहुल बजाज यांना राज्यसभेवर पाठवताना महाराष्ट्रातील पक्षांनी एकमुखाने पाठिंबा दिला. त्यांना खासदार म्हणून अल्पकाळ मिळाला, पण राज्यसभेत त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरचे प्रश्न मांडले. राहुल बजाज आज बोलणार म्हटल्यानंतर सभागृहात पूर्ण सभासदांची उपस्थिती होती, त्यांचं भाषण सेंट जॉर्ज स्टाईने ऐकायचे.  

मी एक मित्र गमावला
व्यक्तीगत आमचा मैत्रीचा ओलावा होता, त्यांचा मला पाठिंबा होता.. व्यक्तीश: आमचा मैत्रीचा ओलावा होता असं सांगताना शरद पवार म्हणाले की, गेली काही दिवस त्यांची प्रकृती ठिक नाही हे मला ठाऊक होतं. गेल्या दोन तीन दिवसात जी काही माहिती मिळत होती, ती चिंताजनक होती, आजच्या या बातमीने दुर्दैवाने ते सत्य निघालं. आज ते आपल्यात राहिले नाहीत. व्यक्तीश: सलोख्याला मुकलो, या देशाच्या उद्योजकाला, राष्ट्रहिताचा विचार करणाऱ्या उद्योजकाला देश मुकला. 

संबंधित बातम्या:

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Kidnap Case Palghar : मोठी बातमी! अशोक धोडींचा मृतदेह गाडीच्या डिक्कीमध्ये सापडलाMahakumbh:ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी त्रिपाठीचे महामंडलेश्वर पद काढले, किन्नर आखाड्याकडून मोठी कारवाईRaj Thackeray - Eknath Shinde Pune : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे  पुण्यात एका कार्यक्रमात एकत्रSanjay Shirsat on Dhananjay Munde : कुणी भगवानगडावर गेलं म्हणून मुंडेंबाबत शिरसाटांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Embed widget