एक्स्प्लोर
आमच्या कुंडल्या आहे तर कोणता शनी आडवा येतो?: विखे-पाटील
मुंबई: विरोधकांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत, त्या योग्यवेळी बाहेर काढेन हे मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य असंविधानिक असल्याचं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
'आमच्या कुंडल्या जर मुख्यमंत्र्यांकडे आहेत तर मग कोणता शनी आडवा येतो?' असा सवालही विखे पाटलांनी केला आहे. जर मुख्यमंत्र्याकडे अशी कुठली माहिती असेल तर ती लपवणं हा संविधानाचा भंग आहे, त्यामुळे त्यांनी ही माहिती समोर आणावी, असं आव्हानही विखे पाटलांनी दिलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. 'मुख्यमंत्री सुडाची भाषा करतात हे दुर्दैव आहे, मात्र त्यांनी कितीही धमक्या दिल्या तरी आम्ही घाबरणार नाही.' असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
संबंधित बातम्या:
विरोधकांचं नाक दाबण्याच्या अनेक कुंडल्या हाती : मुख्यमंत्री
तुमच्या धमक्यांना घाबरणार नाही : सुप्रिया सुळे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement