एक्स्प्लोर
काँग्रेसच जीएसटीचा जनक, भाजपने श्रेय लाटू नये : विखे पाटील
मुंबई : जीएसटी हे नवं काही आहे हे भासवण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. मात्र काँग्रेसच्या काळात 2010 सालीच तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनीच जीएसटीची संकल्पना मांडली होती. एक देश, एक टॅक्स ही काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे भाजपने त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये, असं टोला राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हाणला.
संबंधित बातमीः जीएसटी म्हणजे काय?
जीएसटी विधेयकासाठी राज्य विधीमंडळाचं आज विशेष अधिवेशन भरवण्यात आलं आहे. त्यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारची भूमिका मांडल्यानंतर, विखे पाटील यांनी विरोधी पक्षांची बाजू विधीमंडळासमोर मांडली. जीएसटीला विरोध करण्याचा प्रश्नच नाही, असं यावेळी विखे पाटील म्हणाले. मात्र त्यामध्ये काँग्रेसकडून काही बदल सूचवण्यात आले.संबंधित बातमीः GST विधेयक मंजूर झाल्यास नक्की काय होईल? वस्तू स्वस्त होतील की महाग?
मुंबई महापालिकेची स्वायत्तता अबाधित राखली जाणार असेल तर जीएसटीला शिवसेनेची हरकत नसेल, अशी प्रतिक्रिया पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली आहे. दरम्यान याआधी आसाम, बिहार, झारखंड, गुजरात राज्यात जीएसटी विधेयक मंजूर झालं आहे. मात्र महाराष्ट्राच्या या अधिवेशनात काय निर्णय होतो, याकडे देशाच्या नजरा लागल्या आहेत. जीएसटीमुळे देशभर केवळ एकच करप्रणाली लागू होणार असून इतर सर्व करप्रणाली मोडकळीस पडणार आहे. जीएसटी 1 एप्रिल 2017 पासून लागू करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. गरिबांना जीएसटीचा फायदा सर्वाधिक होणार आहे. गरिबांना आवश्यक असणाऱ्या कोणत्याच गोष्टीवर कर बसणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं आहे.संबंंधित बातम्या
जीएसटी म्हणजे काय?
GST विधेयक मंजूर झाल्यास नक्की काय होईल? वस्तू स्वस्त होतील की महाग?
राज्यसभेनंतर GST विधेयक लोकसभेतही मंजूर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement