Pune Zp School : पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा होणार 'स्मार्ट'
पुणे जिल्हातील सगळ्या जिल्हा परिषद शाळा आता डिजीटल होणार आहेत. डिजिटल यंत्रणांचा वापर मुलांमध्ये प्रोग्रामिंग कौशल्ये, प्रॉब्लेम सॉल्विंग आणि क्रिटिकल थिंकिंग विकासित व्हावा यासाठी जिल्हा परिषदेनं पुढाकार घेतला आहे.
![Pune Zp School : पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा होणार 'स्मार्ट' Pune Zp provide computer to 87 schools in zilha parishad school in pune district Pune Zp School : पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा होणार 'स्मार्ट'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/20/00e6f77afa6f7ba38dc07af6f7514fd51681984249729442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune Zp School : पुणे जिल्हातील सगळ्या जिल्हा परिषद (Zilha Parishad) शाळा आता डिजीटल होणार आहेत. डिजिटल यंत्रणांचा वापर मुलांमध्ये प्रोग्रामिंग कौशल्ये, प्रॉब्लेम सॉल्विंग आणि क्रिटिकल थिंकिंग विकासित व्हावा यासाठी जिल्हा परिषदेनं पुढाकार घेतला आहे. पाय जॅम फाऊंडेशन आणि जिल्हा परिषद पुणे यांनी कॉम्प्युटर सायन्स शिक्षण जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मिळावे यासाठीचा सामंजस्य करार केला. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थांना संगणक शिकणं सोपं होणार आहे.
नवे शैक्षणिक धोरण 2020 नुसार कॉम्पूटेशनल थिंकिंग, डिझाईन थिकिंग आणि कोडींग यासारख्या 21 व्या शतकातील कौशल्यांचा विद्यार्थ्यांमध्ये विकास व्हावा, अशी शिफारस करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांनी डिजिटल साहित्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी करता यावा आणि त्यातून विद्यार्थ्यांचे डिजीटल कौशल्य विकसित व्हावे यासाठी विस्तृत प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचं समोर आलं त्यामुळे जिल्हा परिषद शाळेत आता संगणकाचं शिक्षण देण्यात येणार आहे.
शिक्षकांना दिलं जाणार प्रशिक्षण...
ही सगळी कौशल्य विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांनाच सुरवातीला प्रशिक्षण देण्याची गरज आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील 87 शाळांतील सुमारे 200 शिक्षकांसाठी शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. त्याचसाठी पाय जॅम फाऊंडेशन यांचे सोबत सामंजस्य करार करण्यात येत आहे. 87 शाळांमधील बहुतेक शाळा या 250 पेक्षा आधिक विद्यार्थी संख्या असलेल्या असून सृजन प्रकल्प 25000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत संगणक आणि 21 व्या शतकातील कौशल्ये पोचवण्यास सक्षम असणार असल्याचं जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आलं आहे
सामंजस्य करार करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पाय जॅम फाऊंडेशनचे संस्थापक शोएब दार, डाएट प्राचार्या डॉ. शोभा खंदारे, शिक्षण विस्तार अधिकारी किशन भुजबळ, चंद्रकांत उगाले, पंकज पाटील आणि शुभम बडगुजर हे उपस्थित होते.
जिल्ह्यात 12 शाळा बोगस
पुणे जिल्ह्यातील 12 शाळा बोगस असल्याचं तापासत पुढे आलं आहे. मुलांचं भवितव्य अधांतरी राहू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा परिषद शिक्षण विभागाने अनाधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. पालकांनी त्यांच्या मुलांचे प्रवेश घेऊ नये असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे. राज्य सरकारची मान्यता नसूनही शहरा पाठोपाठ जिल्ह्यामध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू असल्याचा प्रकार आता पुढे येऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यातील शाळांचे सर्वेक्षण करण्यात आलं या सर्वेक्षणात जिल्ह्यातील पुरंदर खेड दौंड मुळशी आणि हवेली तालुक्यातील शाळांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)