एक्स्प्लोर

Sassoon Hospital : ससूनच्या ICU त गरीबाचं पोरं उंदीर चावून मरतं; अन् वरिष्ठ डाॅक्टर ड्रग्ज तस्करांच्या अन् चिरडून मारणाऱ्यांच्या पैशात 'मग्न'

पुण्यातील ससून रुग्णालयात वरिष्ठ डाॅक्टरांची उपचार देण्यापेक्षा धनदांडग्यांकडून, ड्रग्ज, गांजाधारींकडून पैसा घेत उपचार बदलण्यापासून ते ब्लड सॅम्पल कचऱ्यात फेकण्यापर्यंत मजल गेली आहे.

Sassoon Hospital : देशात हाताच्या बोटावर मोजता येतील, इतक्या धनदांडग्यांची संख्या झाली असतानाच आता न्याय सुद्धा त्यांच्यासाठीच आणि पैशाच्या बाजूने होणार का? असा प्रश्न पदोपदी उपस्थित होत आहे. पुण्यामध्ये बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराने  (Pune Porsche Car Accident) आलिशान कारने दोघांना रस्त्यावर चिडून मारल्यानंतर ज्या पद्धतीने त्या पोराला वाचवण्यासाठी पुण्यातील अवघी यंत्रणा कार्यरत झाली होती ती पाहता धनदांडग्यांना पैसा फेकून न्याय किती स्वस्त झाला आहे दे दाखवण्याची स्पर्धा लागली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ब्लड सॅम्पल कचऱ्यात फेकण्यापर्यंत मजल

पुण्यातील ससून रुग्णालयात वरिष्ठ डाॅक्टरांची गेल्या काही दिवसांपासून गोरगरीब जनतेला उपचार देण्यापेक्षा धनदांडग्यांकडून, ड्रग्ज, गांजाधारींकडून पैसा घेत उपचार बदलण्यापासून ते ब्लड सॅम्पल कचऱ्यात फेकण्यापर्यंत मजल गेली आहे. अग्रवाल प्रकरणात (Pune Porsche Car Accident) अल्पवयीन पोराचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी ब्लड सॅम्पल पुरावा महत्त्वाचा असताना तो पुरावाच कचऱ्यात टाकून दिल्याचा घृणास्पद प्रकार ससून रुग्णालयामध्ये घडला आहे. त्यामुळे ससून रुग्णालयातील कारनामा पुन्हा एकदा उघड झाला आहे. ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांनी ब्लड सॅम्पल घेऊन कचऱ्याच्या डब्यात फेकून दिल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. 

वरिष्ठ डाॅक्टरांनीच पदाला काळीमा फासली 

गेल्या काही दिवसांपासून ससून रुग्णालय गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना उपचार देण्यापेक्षा तेथील गैरकारभारामुळे सर्वाधिक चर्चेत आहे. ससून रुग्णालयामध्ये काही दिवसांपूर्वी आयसीयूत चक्क उंदीर चावून एका गरीब तरुणाचा मृत्यू झाला होता. त्या घटनेपूर्वी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाने ससून रुग्णालयाचा कारभार संपूर्ण प्रकार चव्हाट्यावर आला होता. 

त्यामुळे ससून रुग्णालयामध्ये पैसा फेको आणि तमाशा देखो पद्धतीने  उपचारांमध्ये हवा तसा बदल करून घ्या किंवा सॅम्पल सुद्धा कचऱ्यामध्ये टाकून दिलं जाईल अशी व्यवस्था निर्माण झाली आहे का? असाच प्रश्न उपस्थित होत आहे. ललित पाटील प्रकरणाने ससू रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली गेली. ज्या पद्धतीने ललित पाटीलने जेलमधील मुक्काम ससून मध्येच ठोकला होता आणि त्याला हव्या त्या पद्धतीने फाईव्ह स्टार ट्रीटमेंट देण्यात आली यावरून सुद्धा नाचक्की झाली आहे. 

ललित पाटील प्रकरणात तत्कालिन डीन दोषी 

गेल्यावर्षी अवघ्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात ससून हॉस्पिटलचे तत्कालिन (Sasoon Hospital) डीन डॉक्टर संजीव ठाकूर (Sanjeev Thakur)  यांना पदमुक्त करण्यात आले होते. विभागीय चौकशीचे सुद्धा आदेश देण्यात आले आहेत. आर्थोपेडीक सर्जन डॉ. प्रवीण देवकाते यांनाही निलंबित करण्यात आले होते. ड्रग माफिया ललित पाटीलला मदत केल्याचा आरोपानंतर संजीव ठाकूर यांची  चौकशी करणाऱ्या समितीने दोषी ठरवलं होतं. समितीच्या अहवालात ललित पाटीलचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढण्यासाठी ठाकूर यांची मदत होत होती. ठाकूर यांच्या सांगण्यावरून डॉ. प्रवीण देवकाते हे ललित पाटील आजारी असल्याचे खोटे रिपोर्ट तयार करत असल्याचे समोर आले होते. ललित पाटील ससून रुग्णालयात डिसेंबर 2020 पासून ठाण मांडून होता. ललित पाटील आणि त्याच्या टोळीवर मोक्का लावण्यात आला आहे. ललित पाटीलने कधी टीबी, कधी आल्सर, तर कधी हार्नियाचे कारण सांगत, तर कधी जिन्यावरून पडल्याचा बनाव केला होता.

ससूनमध्ये उपचारासाठी आला आणि उंदराची शिकार झाला

एका बाजूने डाॅक्टरांचा गोरखधंदा सुरु असताना ससून रुग्णालयामध्येच आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या तरुणाचा उंदीर चावल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सागर रेणूसे असं मृत्यू झालेल्या 30 वर्षीय तरुणाचं नाव आहे. त्यामुळे डाॅक्टरांचा धंदा सुरु असताना सर्वसामान्य मात्र उंदराची शिकार होत आहेत. सागर रेणूसेचा भोर तालुक्यात अपघात झाला होता. 16 मार्चला त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. आयसीयूमध्ये उपचार सुरु असताना 26 मार्चला त्याची प्रकृती खालावत होती. त्यानंतर नेमकं काय झालं याचा शोध घेतला असता उंदीर चावल्याचे समोर आले होते. आयसीयूमध्ये त्याच्या डोक्याला, कानाला आणि इतर अवयवांना उंदराने चावा घेतला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Bangar on Vidhan Sabha : 25 हजारांच्या फरकाने सीट निघेल, मतदानानंतर संतोष बांगर निवांतRajesaheb Deshmukh : धनंजय मुंडे यांच्या गुंडानी मतदानाच्या मशीन फोडल्य,देशमुखांचा हल्लाबोलSolapur Sharad Koli Crime : प्रणिती शिंदेंविरोधात आंदोलन करणाऱ्या कोळींविरोधात गुन्हा दाखलAvinash Jadhav Misal Pav : मतदानानंतर निवांत,अविनाश जाधवांनी लुटला मामलेदार मिसळीचा आस्वाद...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
Embed widget