कास फिरण्यासाठी निघालेल्या चौघांवर काळाचा घाला, भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत पुणे - पंढरपूर मार्गावर जागीच मृत्यू
लासूर्णे येथून फक्त 20 किमी अंतरावर असणाऱ्या कारूंडे (ता.माळशिरस) येथील पुलावर सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास या टेम्पोने कारला धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला.
सोलापूर : पुणे- पंढरपूर मार्गावरील ( कारूंडे (ता.माळशिरस) (Pune- Pandharpur Accident) येथे पुलावर झालेल्या कार व टेम्पोच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.हा अपघात रविवार सकाळी आठच्या सुमारास घडला. अपघाताची भीषणता एवढी होती की यामध्ये दोन्ही वाहनांचा चुराडा झाला.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार , लासूर्णे (ता.इंदापूर ) येथील राजेश शहा हे आपल्या कामगारांना घेऊन सातारा येथील कासपठार पाहण्यासाठी निघाले होते. ते नातेपुते येथून राँग साईडने निघाल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. लासूर्णे येथून फक्त 20 किमी अंतरावर असणाऱ्या कारूंडे (ता.माळशिरस) येथील पुलावर सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास या टेम्पोने कारला धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला.
जखमींना रुग्णालयात दाखल
यामध्ये राजेश अनिल शहा (वय 55), दूर्गेस शंकर घोरपडे (वय 28), कोमल विशाल काळे (वय 32), शिवराज विशाल काळे (वय 10) यांचा जागीच मृत्यू झाल. तर या अपघातात आकाश लोंढे (वय 25), पल्लवी बसवेश्वर पाटील (वय 30), अश्वीनी दूर्गेश घोरपडे हे जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
यवतमाळमध्ये ड्रंक अँड ड्राइव्हने घेतला आजोबा आणि नातवाचा बळी
यवतमाळच्या महागाव तालुक्यातील नागपूर-तुळजापूर महामार्गावरील नांदगव्हाण येथे ड्रंक अँड ड्राईव्हने आजोबा आणि नातवाचा बळी घेतला. मद्य प्राशान केलेल्या ट्रक चालकाने स्कुटी वरून जाणाऱ्या आजोबा आणि नातवाला चिरडले. रमनिकभाई पटेल (65) आणि केतव राजेश पटेल (19) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे उमरखेड शहरातील हनुमान वॉर्डमधील रहिवासी होते. अपघातात दोघांना चिरडून वाहनासह पळ काढणाऱ्या ट्रकचालकास उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंतराव गायकवाड यांनी पाठलाग करून पकडले. महेंद्र नथूजी बागडे (56) असे आरोपी ट्रक चालकाचे नाव आहे. मृतक रमनिकभाई पटेल नातू केतव राजेश पटेल यास महागाव येथील एका शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश करण्यासाठी स्कुटीवरून महागावकडे येत होते.
हे ही वाचा :
चेंबूरमध्ये अग्नितांडवात 7 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री शिंदेंकडून छेदीराम गुप्तांना 35 लाखांच्या मदतीची घोषणा