एक्स्प्लोर

आधी शिवसेनेच्या वरुण सरदेसाईंची भेट, आता रुपाली पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश; पार्थ पवार म्हणतात....

Rupali Patil Join NCP : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेच्या पुण्यातील फायरब्रँड नेत्या रुपाली पाटील ठोंबरे  यांनी आज अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात प्रवेश केलाय.

Rupali Patil Join NCP : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेच्या (MNS) पुण्यातील फायरब्रँड नेत्या रुपाली पाटील ठोंबरे  (Rupali Patil MNS) यांनी आज अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात प्रवेश केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश झाला.  यावेळी रुपाली ठोंबरे यांच्यासह लावण्या शिंदे,  वंदना साळवी, मनीषा सरोदे, मनिषा कावेडीया, प्राजक्ता पाटील, प्रिया पाटील, निशा कोटा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.  तसेच मालेगावमध्येही राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग झालेय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मालेगाव शहराध्यक्ष असिफ शेख यांच्या पुढाकाराने भाजपा, जनता दल, एमआयएम या पक्षांमधून अब्दुल माजीद चमडेवाले, अन्सारी अकील, शर्जील अन्सारी, बिलाल बिल्डर, अन्सारी नईम अहमद यांनी पक्ष प्रवेश केला. अन्सारी शोएब अहमद, सोहेल अख्तर, अबुझर अन्सारी, फरीद अहमद, दरगाही फन्वाद, दरगाही फहाद, अतुल सुर्यवंशी, मन्सूर अख्तर उस्मान गणी, रईस उस्मानी यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हाती बांधले.

रुपाली पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पत्र लिहून, आपण सर्व पदं सोडत असल्याचं सांगितलं होतं. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असतानाच रुपाली पाटील यांनी मनसेला रामराम ठोकलाय. हा मनसेसाठी मोठा झटका मानला जात आहे. मुंबईत काही कामानिमित्त मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि युवा सेना नेते वरूण सरदेसाई यांची भेट झाली होती. त्यामुळे रुपाली पाटील नेमकं कोणत्या पेक्षात प्रवेश करणार याबाबत उत्सुकता लागली होती. अखेर आज, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पार्थ पवार यांनी ट्वीट करत याबाबतची माहितीही दिली. आपल्या ट्वीटमध्ये पार्थ पवार म्हणतात की, "Adv. रुपाली पाटील ठोंबरे यांचे राष्ट्रवादी परिवारात स्वागत आहे. पुण्यातील तरुण आणि महिलांशी संबंधित प्रश्न हिरीरीने मांडण्यात त्या कधीच मागे हटल्या नाहीत. मला पूर्ण विश्वास आहे की त्या यापुढेही तितक्याच तीव्रतेने आणि सचोटीने काम करत राहील."

कोण आहेत रुपाली पाटील?
रुपाली पाटील ठोंबरे या मनसेच्या फायरब्रँड नेत्या होत्या. पुणे मनसेचा आक्रमक आणि लढवय्या चेहरा म्हणून त्या ओळखल्या जात होत्या.  मनसेच्या पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष म्हणून त्या कार्यरत होत्या.  तरुण-तरुणी, महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी विशेष काम केलं. त्या पुणे मनपात मनसेच्या नगरसेविका होत्या.   2017 मध्ये पुणे मनपाच्या प्रभाग क्रमांक 15 मधून निवडणूक लढवली होती. त्यावेळी गरोदर असून गल्ली बोळात प्रचार करुन त्यांनी लक्ष वेधलं होतं.  महत्त्वाचं म्हणजे प्रचारादरम्यानच त्यांना प्रसव वेदना झाल्या.  त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांनी मुलाला जन्म दिला होता.   

मनसेला रामराम करण्यापूर्वी रुपाली पाटील काय म्हणाल्या?
रुपाली पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.  त्या म्हणाल्या, "मी राज ठाकरेंना पाहून राजकारणात आले, मला राजकीय वारसा नाही.  लग्नाच्या आधीसुद्धा पक्षासाठी जेलमध्ये जाऊन आले, गुन्हे दाखल झाले. पक्षासाठी काम केलं.  माझ्या स्वार्थासाठी राज ठाकरेंना वाईट  बोलणार नाही, पण जी काही माझी खदखद आहे,  ती व्यक्त केली आहे. मनसेमध्ये निस्वार्थी प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत.  बहीण म्हणून या परिवारात मी सोबत असेन. पण काही कारणांमुळे पक्षाचा राजीनामा दिला. लोकांना न्याय देण्यासाठी खंबीर साथीची गरज असते, ते राज साहेबांना कळवलं आहे.  त्यासाठी मी राजसाहेबांना वाईट बोलेन अशी मी स्वार्थी नाही,  परंतु माझ्या कारणांमुळे पक्षाचा राजीनामा दिला आहे,  बदल कोणाच्यात घडत नसेल तर मला स्वत:च्यात बदल करावा लागेल, राज ठाकरे माझे दैवत आहेत, आणि राहतील", असं रुपाली पाटील म्हणाल्या.  

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Embed widget