एक्स्प्लोर

Pune By-election : कसबा, चिंचवड मतदार संघातून भाजपचा उमेदवार ठरला, घोषणा कधी? चंद्रकांत पाटील यांनी दिली महत्त्वाची माहिती

कसबा आणि चिंचवड विधानसभेत पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून या  दोन्ही जागांवर नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्या उमेदवारांंची यादी ठरली आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

Pune By election : कसबा (Kasba By-Election) आणि चिंचवड विधानसभेत  (Chinchwad By-Election)  पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून या  दोन्ही जागांवर नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दोन्ही कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळेल की अन्य कोणत्या नेत्याला उमेदवारी दिली जाणार यावर अनेकांच्या नजरा आहेत. त्यातच कुटुंबीय सोडले तर या जागेच्या उमेदवारीसाठी अनेक नेते इच्छूक देखील आहेत. हे उमेदवार निवडीसाठी रोज भाजपमध्ये बैठकांंचं सत्र सुरु आहे. या बैठकीत उमेदवाराची निवड दिल्लीतून होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यातच चंद्रकांत पाटलांनी उमेदवारांसंदर्भातील चर्चेला पूर्णविराम दिला आहे 1 फेब्रुवारीला उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल असे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणले की, कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची यादी तयार झाली आहे. ती यादी केंद्रीय समितीकडे आम्ही शुक्रवारी (दि.27) पाठवणार आहोत. केंद्रीय समिती 31 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारी रोजी बैठक घेईल. त्यावेळी आमच्या यादीवर विचार केला जाईल. त्यानंतर दिल्लीतून 31 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारीला उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले.

'या' दोघांवर निवडणुकीची जबाबदारी

काल (25 फेब्रुवारी) भाजपने चिंचवड मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती. त्यात उमेदवार जाहीर करतील अशी अपेक्षा होती. मात्र या बैठकीत भाजपची राजकीय रणनिती ठरली.  या बैठकीला आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू लक्ष्मण जगताप, पत्नी अश्विनी जगताप, मुरलीधर मोहोळ, आमदार महेश लांडगे यांच्यासह चिंचवडचे स्थानिक भाजपनेते उपस्थित होते. या सगळ्या पोटनिवडणूकीची जबाबदारी आमगार महेश लांडगे आणि मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

मी फडणवीसांकडून शिकलं पाहिजे...

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहे. मी देखील त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. राज्यात फडणवीस यांनी लहान वयात एक विश्वासार्हता निर्माण केली आहे. ते कोणत्याही विषयावर माहितीच्या आधारे बोलतात आणि त्यांना कधीही विधान मागे घ्यावे लागले नाही. माझ्या सारख्याने त्यांच्याकडून धडा शिकला पाहिजे. मी निरागसपणे काहीतरी बोलतो आणि माझं मोठं मन असल्याने दिलगिरीही व्यक्त करतो. त्यामुळे तुम्हाला फार काळ आंदोलन करण्याची मी संधी देत नाही. फडणवीस यांनी जे काही म्हटले त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. मी बोलतो मग मला दिलगिरी व्यक्त करावी लागते, त्यामुळे त्यांच्याकडून मी धडा घेतला पाहिजे, असं ते म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
PM Modi In Nigeria : पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  1 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNavneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर आम्हाही तीच भाषा करू - नवनीत राणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
PM Modi In Nigeria : पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Embed widget