एक्स्प्लोर
पुण्यात आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला लाच घेताना अटक
पुणे : पुण्यातील स्वारगेटमध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. सुरेश ढमाले यांच्या तक्रारीनंतर सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. राजेंद्र बी. दोंड असं अटक केलेल्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्याचं नाव आहे.
तक्रारदार सुरेश ढमाले यांनी 2012 मध्ये फ्लॅट आणि दुकान खरेदी केलं होतं. पण त्यांनी खरेदी केलेल्या दुकानाच्या दरात रेडी रेकनर आणि खरेदी किंमतीमध्ये 35 लाखांची तफावत येत होती. यावरुन आयकर विभागाचा अधिकारी राजेंद्र दोंड त्यांची अडवणूक करत होता. शिवाय या प्रकणातून सुटण्यासाठी ढमाले यांच्याकडून 2 लाखांची लाच मागत होतं.
राजेंद्र दोंड सातत्याने लाचेची मागणी करत असल्यामुळे सुरेश ढमाले यांनी सीबीआयच्या अँटी करप्शन ब्युरोकडे याबाबत तक्रार केली. ढमालेंच्या तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर सापळा रचून, गुरुवारी संध्याकाळी राजेंद्र दोंड यांना लाचेचा पहिला हफ्ता म्हणून एक लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement