Pune Crime news : नवराच ठरला हैवान! पत्नीला अश्लील नृत्य करायला लावलं, व्हिडीओ काढले अन्...
पतीनेच पत्नीचा नग्न व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पत्नीने थेट समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.
Pune Crime news : पुण्यातून एक नात्याला काळीमा फासणारा प्रकार समोर आला (Pune Crime News) आहे. पतीनेच पत्नीचा नग्न व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पत्नीने थेट समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला आहे. पतीनेच असं कृत्य केल्याने विश्वास नेमका कोणावर ठेवावा,असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तक्रारीनुसार, 31 वर्षीय पत्नीचं 2015 मध्ये लग्न झाले होते. तेव्हापासून आरोपीने तिला अनेकदा नग्न नृत्य करण्यास भाग पाडले आणि मोबाईल फोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केले. जेव्हा-जेव्हा तिने याला आक्षेप घेतला तेव्हा तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत असे, असेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे. पत्नीने पुढे असेही आरोप केले की, पतीने तिला अनेक प्रसंगी अश्लील साहित्य दाखवून अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. या त्रासाला कंटाळून ती आई-वडिलांकडे परतली आणि त्यांच्यासोबत राहू लागली. त्यावेळी तेथे तिचा आणि तिच्या कुटुंबाचा छळ सुरूच राहिला. त्यानंतर पत्नी सेक्स रॅकेट चालवते, अशी तिच्या कुटुंबियांसमोर बदनामी केली. हा सगळा प्रकार काही वर्ष पत्नीनं सहन केला. मात्र त्यानंतर पत्नीने त्रासून पोलिसांत धाव घेतली आहे. पत्नीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.
पतीसमोरच पत्नीवर अत्याचार पण...
काही दिवसांपूर्वी पतीसमोरच पत्नीवर अत्याचार केल्याचं समोर आलं होतं. उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने खाजगी सावकाराने (Savkar) त्या व्यक्तीला समोर बसवून त्याच्या बायकोवर बलात्कार (Rape) केला होता. इतकंच नाही तर या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ तयार करुन हा व्हिडीओ आरोपीने सोशल मीडियावर व्हायरल केला होता. पुण्यातील हडपसर (Hadapsar) परिसरात फेब्रुवारी 2023 मध्ये ही घटना घडली होती. 34 वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपी इम्तियाज हसीन शेख (वय 47 वर्षे) याच्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली होती. पीडित महिलेच्या पतीला आरोपीने उसने पैसे दिले होते. उसने घेतलेले हे पैसे फिर्यादीचा पती परत करु शकला नाही. त्यामुळे आरोपीने फिर्यादी आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत हडपसर येथील म्हाडा कॉलनीत बोलावून घेतले. त्यानंतर तक्रारदार महिलेच्या पतीला समोर बसून चाकूचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी दिली. सोबतच तक्रारदार महिलेसोबत पतीसमोरच जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. यावेळी पतीही शांतपणे सगळं बघत असल्याने पतीवर संताप व्यक्त केला जात होता.