Pune Crime News : आयटी कर्मचाऱ्याने आधी 8 वर्षाच्या मुलाची, पत्नीची हत्या केली, नंतर स्वत:ला संपवलं; नेमकं काय घडलं?
पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली असून पुण्याच्या औंध परिसरातील 44 वर्षीय व्यक्तीने स्वतःच्या पत्नीचा आणि 8 वर्षाच्या मुलाची हत्या करून स्वतः आत्महत्या केली आहे.
Pune Crime News : पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत (Pune Crime News) आहे. त्यात आता पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्याच्या औंध परिसरातील 44 वर्षीय व्यक्तीने स्वतःच्या पत्नीचा आणि 8 वर्षाच्या मुलाची हत्या करून स्वतः आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. हे तिघे हरवल्याची तक्रार चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री दाखल झाल्याची माहिती आहे.
सुदिप्तो गांगुली असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. त्याने पत्नी प्रियांका सुदिप्तो गांगुली (वय. 40 ) आणि मुलगा तनिष्क सुदिप्तो गांगुली (वय. 08) यांची हत्या करून आत्महत्या केल्याची प्राथमिक महिती आहे. गांगुली हा मंगळवारी रात्री फोन उचलत नव्हता. बेंगलोर येथील त्याचा भाऊ आणि मित्र शोध घेत होते. त्याचा शोध घेण्यासाठी सुदिप्तोचा भाऊ पुण्यात आला त्यावेळी त्याने आणि पोलीसांनी सुदिप्तो गांगुली यांचे औंध परिसरातील घर गाठले त्यावेळी त्या घरात तिघांचे मृतदेह आढळले. लहान मुलाच्या आणि पत्नीच्या तोंडाला पॉलिथीनची बॅग बांधलेली होती. या सगळ्या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.
सुदिप्तो गांगुला हा टीसीएस कंपनीमध्ये आयटीआय अभियंता म्हणून कामाला असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र तो टीसीएसमध्ये नेमक्या कोणत्या पदावर कामाला होता याबाबत अधिक माहिती मिळाली नाही. एवढ्या मोठ्या कंपनीत काम करत असलेल्या व्यक्तीने असं टोकाचं पाऊल का उचललं, याची अद्याप कोणतीही माहिती नाही. शिवाय त्यांनी मुलाची आणि पत्नीची हत्या केली आणि नंतर स्वत: आत्महत्या केल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवला आहे.
घरातच आढळले मृतदेह
हवल्याची तक्रार दाखल केल्यानंतर सुदिप्तो यांचा भाऊ पुण्यात भावाला शोधायला आले. त्यांनी पोलिसांना सोबत घेऊन घर तर घरातच दोघांचेही मृतदेह आढळून आले. त्यानंतर त्यांच्या भावाला धक्का बसला. पोलीस आणि कुटुंबीय घटनेमागचं नेमकं कारण शोधत आहेत.