एक्स्प्लोर

Pune Crime : जनावरांच्या दूध वाढीसाठी औषधांचा बेकायदा वापर, पुण्यात कंपनीवर छापा; पाच जण ताब्यात

जनावरांचे दूध वाढवण्यासाठी बेकायदेशीरपणे दिल्या जाणाऱ्या औषधाच्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

Pune Crime News :  जनावरांचे दूध (Milk) वाढवण्यासाठी बेकायदेशीरपणे दिल्या जाणाऱ्या औषधाच्या कारखान्यावर छापा टाकण्यात (Pune Crime) आला आहे. पुणे (Pune) पोलिसांनी (Pune Police) हा सगळा प्रकार उघडकीस आणून 52 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त (seize) करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक आणि औषध विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

समीर अन्वर कुरेशी (वय 29, रा. कलवड वस्ती, लोहगाव), बिश्वजीत सुधांशु जाना (वय 44, रा. पुरबा बार, विलासपुर, पुरबा मदीनीनपुर, पश्‍चिम बंगाल), मंगल कनललाल गिरी (वय 27, तिराईपूर, पश्‍चिम बंगाल), सत्यजीत महेशचंद्र मोन्डल (वय 22, रा. नबासन कुस्तीया पंचायत, पश्‍चिम बंगाल) आणि श्रीमंता मनोरंजन हल्दर (वय 32, रा. नलपुरकुर, मंडाल,पश्‍चिम बंगाल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

पुण्यातील लोहगाव परिसरातील कलवड वस्तीत  गाई, म्हशीच्या दुधात वाढ होण्यासाठी ऑक्‍सिटॉसिन वापर मोठ्या प्रमाणत सुरु होता. या औषधाचा बेकायदा साठा असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली होती. या पथकाने "एफडीए'च्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली होती. पत्र्याच्या शेडमध्ये काही पुठ्यांच्या खोक्यात हा औषधांचा साठा केला आहे, अशी माहिती उघडकीस आली होती. या सगळ्याची माहिती मिळताच शनिवारी लोहगावमधील कलवड वस्ती तेथे छापा टाकला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

औषध विक्रेते आहोत असं सांगत केली होती विक्री
पाचही जणांची टोळी पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश मधून आलेली होती. काही दिवसांपासून ही टोळी पुण्यात वास्तव्यास होती. या टोळीने औषध विक्रेता असल्याचे सांगत अनेकांना औषध विकले होते. फसवणूक, प्राण्यांना अमानुष वागणूक देणे, अशा अनेक कलामानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळीने नेमकं कोणाकोणाला औषध विकले आहेत, याचा तपास सुरू आहे.

नागरिकांच्या जीवाला धोका
ऑक्‍सिटॉसिन हे एक हार्मोन इंजेक्शन असून महिलांना प्रसूतीच्या वेळेस दिले जाते. तसेच त्याचा वापर केल्याने जनावरांकडून अधिकचं दूध प्राप्त होतं. मात्र हे दूध नागरिकांसाठी हानिकारक असल्याने त्याच्यामुळे विविध रोग पसरू शकतात. यामुळे श्वसनाचे आजार, लहान मुलांमध्ये कावीळ, महिलांचा गर्भपात अशा अनेक गंभीर आजारांना आपल्याला सामोरे जावे लागू शकते. या औषधाच्या विक्रीने नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या कारखान्यावर तातडीने कारवाई करण्यात आली आहे. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'Chhatrapati Shivaji Maharaj Statue :जपानच्या टोकियोत बसवणार शिवरायांचा पुतळा, देशभरात रथयात्रा सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Embed widget