
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime : आजोबाच दाखवायचे 11 वर्षीय नातीला अश्लील व्हिडीओ; समुपदेशनाच्या वर्गातून धक्कादायक प्रकार समोर
नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. आजोबानेच 11 वर्षाच्या नातीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. शाळेतील समुपदेशनाच्या वर्गात ही माहिती 11 वर्षाच्या मुलीने सांगितली आहे.

Pune Crime News : नात्याला काळीमा फासणारी (crime) घटना समोर आली आहे. 11 वर्षाच्या नातीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. शाळेतील समुपदेशनाच्या वर्गात ही माहिती 11 वर्षाच्या मुलीने सांगितली आहे. 23 वर्षीय महिलेने या संदर्भात तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरुन पुण्यातील कोंढवा पोलिसांनी आजोबांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेतील बॅड टच आणि गुड टच म्हणजेच समुपदेशनाचा कार्यक्रम सुरु होता. तक्रारदार महिला शाळेतील चौथीच्या वर्गावर बॅड टच आणि गुड टचचा क्लास घेत होत्या. त्यावेळी सगळ्या विद्यार्थिनी एक एक प्रसंग सांगत होत्या. त्यावेळी एका मुलीने तिचे आजोबा तिच्यासोबत घाणेरडं वर्तन करतात असं सांगितलं. ते ऐकून तक्रारदार महिलेला धक्का बसला. त्या महिलेने मुलीला सगळा प्रकार विचारण्याचा प्रयत्न केला. हळूहळू त्या विद्यार्थिनीकडून सगळा प्रसंग काढून घेतला. आजोबा माझ्यासोबत गैरवर्तन करतात. माझे आजोबा मला मांडीवर घेऊन बसतात आणि अश्लील चाळे करतात. मी आरडाओरड केली तर माझं तोंड दाबतात. मला गप्प राहायला सांगतात, असं त्या विद्यार्थिनीने सांगितलं.
आजोबाच दाखवायचे नातीला अश्लील व्हिडीओ
क्लासमध्ये विद्यार्थिनी मोकळेपणाने घडलेला प्रसंग सांंगितला. त्यावेळी आजोबाच नातीला अश्लील व्हिडीओ दाखवत असल्याचं समोर आलं. मुलीला मांडीवर घेऊन बसत तिच्यासोबत चाळे करत असल्याचंही समोर आलं आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पॉक्सो (POCSO Act) अंतर्गत गुन्हा दाखल करुन आजोबाला अटक केली आहे. पुण्यातील अनेक शाळेत असे समुपदेशनाचे क्लास किंवा वर्ग घेतले जातात. त्यातून अनेकदा असे प्रसंग विद्यार्थीनी शेअर करतात.
यामुळे समुपदेशन गरजेचं
सध्या पुण्यात अनेक शाळांमध्ये शाळकरी मुलींसाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या समुपदेशनाचा वर्ग घेतला जातो. त्यात अनेक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. सायकोलॉजिस्ट किंवा इतर डॉक्टर प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसतात. या संवादातून विद्यार्थिनींना अनेक प्रकारचं मार्गदर्शन केलं जातं. लैंगिकतेबाबत माहिती दिली जाते. त्यासोबतच गुड टच बॅड टच याची देखील उत्तम प्रकारे माहिती दिली जाते. यामुळे विद्यार्थिनींना लैंगिक छळाबाबत माहिती मिळते. कधी काळी त्यांच्यावर अशा पद्धतीने काही गैरवर्तन केलं का? ते तुमचे कोण होते? अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. या सगळ्यांचा शाळकरी मुलींना फायदा होत आहे आणि यातून रोज नवे प्रकरणं समोर येत असून त्या आरोपींवर गुन्हा देखील दाखल होत आहे.
संबंधित बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
