एक्स्प्लोर

Pune Crime News : पुण्यातील चोरांना YAMAHA RX 100 गाडीची भूरळ... 'दिसली की उचल' करत चोरल्या 16 गाड्या

पुण्यातून गेल्या काही दिवसांपासून यामाहा कंपनीच्या आणि त्याही फक्त आर एक्स हंड्रेड मॉडेलच्या गाड्या चोरीला जात होत्या. ऐंशी आणि नव्वदच्या दशकात लोकप्रिय ठरलेल्या या गाड्यांना आजही मोठी मागणी आहे.

Pune Crime News :  पुणेकरांची शक्कल आणि शौक याची चांगलीच चर्चा होते. त्यात आता पुण्यातील गुन्हेगारांची शक्कल आणि त्यांच्या शौकचीदेखील चर्चा रंगताना दिसत आहे. एखादी गाडी आवडली की उचलायची, अशी मोहिम पुण्यातील काही भुरट्या चोरांनी सुरु केली. पुण्यातून गेल्या काही दिवसांपासून यामाहा कंपनीच्या आणि त्याही फक्त आर एक्स हंड्रेड मॉडेलच्या गाड्या चोरीला जात होत्या. ऐंशी आणि नव्वदच्या दशकात लोकप्रिय ठरलेल्या या गाड्यांना आज देखील मोठी मागणी असून हौशी लोक लाखों रुपयांना या गाड्या खरेदी करतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन पुण्यातील दोन तरुणांनी शहरातून या गाड्या चोरण्याचा सपाटा लावला होत.

पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागातील CCTV कॅमऱ्यामधील फुटेज तपासून या आरोपींपर्यंत पोहचण्यात यश मिळवलं. या आरोपींनी अशा 20 यामाहा आर एक्स हंड्रेड गाड्या चोरल्याचं समोर आलं आहे. त्यापैकी 16 गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मागील वर्षभरात अनेक गाड्या चोरीला जात होत्या. त्यात सगळ्या नागरिकांच्या तक्रारी यामाहा कंपनीच्या गाड्या चोरी गेल्याच्या होत्या. त्यानंतर या सगळ्याच गाड्या शोधण्यासाठी पथक नेमण्यात आलं होतं. या पथकाने गाड्यांची चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी शहराती तब्बल 440 CCTV तपासले आणि या गाड्या जप्त केल्या.

आरोपी आदित्य मानकर (वय 19, रा. उरुळी कांचन, पुणे), मयूर पवार (वय 20, उरुळी कांचन, पुणे) आणि अन्य एक जण अशी अटक करण्यात आलेल्या चोरांची नावं आहेत. उरळीकांचन परिसरात रात्रीच्या वेळी मोटर सायकल चोरी करून जात असल्याचे पोलिसांना त्यांच्या बातमीदाराच्या मदतीने माहिती मिळाली होती. त्यानुसार सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा तपास सुरू होता. त्यानंतर अखेर त्यांनी गाड्या आणि तीन चोरांना बेड्या ठोकल्या आहेत. 

440 सीसीटीव्ही तपासले..

पुणे शहरातील विविध भागातून या चोरट्यांनी चोरलेल्या तब्बल 16 आर एक्स 100 या यामाहा कंपनीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. यासाठी पोलिसांनी पुणे शहरातील तब्बल 440 CCTV तपासले आहेत. एका एका CCTV फुटेज पाहून पोलिसांनी त्या परिसरातून या गाड्या जप्त केल्या आहेत. तब्बल 4 लाख 50 हजार एवढी या गाड्यांची किंमत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दारू विक्री, वाहनांच्या लांबच लांब रांगा, अपघाताचा धोका वाढला
समृद्धी महामार्गावर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दारू विक्री, वाहनांच्या लांबच लांब रांगा, अपघाताचा धोका वाढला
Guillain Barre Syndrome: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान; एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद, 16 रुग्ण व्हेंटीलेटरवर
पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान; एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद, 16 रुग्ण व्हेंटीलेटरवर
Sharad Pawar Camp: सोलापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा झटका, 'हा' बडा ओबीसी नेता शिंदे गटाच्या वाटेवर
सोलापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा झटका, 'हा' बडा ओबीसी नेता शिंदे गटाच्या वाटेवर
एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 27 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सVijay Wadettiwar : ... तर ST भाडेवाढ तात्काळ मागे घेत जनतेला दिलासा द्यावा९ सेकंदात बातमी Top 90 at 9AM Superfast 27 January 2025 सकाळी ९ च्या महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 27 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दारू विक्री, वाहनांच्या लांबच लांब रांगा, अपघाताचा धोका वाढला
समृद्धी महामार्गावर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दारू विक्री, वाहनांच्या लांबच लांब रांगा, अपघाताचा धोका वाढला
Guillain Barre Syndrome: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान; एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद, 16 रुग्ण व्हेंटीलेटरवर
पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान; एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद, 16 रुग्ण व्हेंटीलेटरवर
Sharad Pawar Camp: सोलापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा झटका, 'हा' बडा ओबीसी नेता शिंदे गटाच्या वाटेवर
सोलापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा झटका, 'हा' बडा ओबीसी नेता शिंदे गटाच्या वाटेवर
एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
Pradosh Vrat 2025 : एकवेळ उपाशी राहा, पण प्रदोष व्रतात चुकूनही करू नका 'ही' कामं; कोसळेल संकटांचा डोंगर
एकवेळ उपाशी राहा, पण प्रदोष व्रतात चुकूनही करू नका 'ही' कामं; कोसळेल संकटांचा डोंगर
Vijay Wadettiwar on ST Fair Hike : एसटी दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी, हे खाते चालवते कोण? विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर घणाघाती प्रहार
एसटी दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी, हे खाते चालवते कोण? विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर घणाघाती प्रहार
Masik Shivratri 2025 : आज वर्षातील पहिल्या मासिक शिवरात्रीला करा 'हे' छोटे उपाय; क्षणात उघडेल निद्रीस्त भाग्य, सुख-संपत्तीत होईल अपार वाढ
आज वर्षातील पहिल्या मासिक शिवरात्रीला करा 'हे' छोटे उपाय; क्षणात उघडेल निद्रीस्त भाग्य, सुख-संपत्तीत होईल अपार वाढ
Orange Growers Compensation : सततच्या पावसाने नुकसान झालेल्या विदर्भातील संत्रा उत्पादकांना तब्बल 165 कोटींची नुकसान भरपाई जाहीर; मात्र, नागपूरला दीड दमडी सुद्धा नाही!
सततच्या पावसाने नुकसान झालेल्या विदर्भातील संत्रा उत्पादकांना तब्बल 165 कोटींची नुकसान भरपाई जाहीर; मात्र, नागपूरला दीड दमडी सुद्धा नाही!
Embed widget