एक्स्प्लोर

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसलेंची रवानगी नजरकैदेत, 30 मे रोजी पुन्हा कोर्टापुढे हजर करणार 

Avinash Bhosale Arrest : येस बँक-डीएचएफएल फसवणूक प्रकरणी कारवाई करत सीबीआयने अविनाश भोसलेंना अटक करण्यात आली आहे.

मुंबई:  येस बँक-डीएचएफएल फसवणूक प्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसलेंची रवानगी नजरकैदेत करण्यात आली आहे. त्यांना सीबीआयच्या बीकेसीतील विश्रामगृहात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दोन दिवस सायंकाळी 5 ते 6 दरम्यान भोसलेंना त्यांच्या वकिलांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

सीबीआयनं भोसलेंची 10 दिवसांकरता रिमांड मागितली होती. मात्र सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसलेंच्या वकिलांनी रीमांडला विरोध केला. भोसलेंच्या रीमांडला विरोध करत दाखल केलेल्या अर्जाला उत्तर देण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. 30 मे रोजी सकाळी अविनाश भोसलेंना सकाळी 11 वाजता पुन्हा कोर्टापुढे हजर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

येस बँक-डीएचएफएल फसवणूक प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केलेले पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले (Avinash Bhosle) यांना आज विशेष सीबीआय न्यायालयात हजर केलं गेलं होतं. भोसले हे महाराष्ट्रातील राजकारण्यांचे जवळचे सहकारी असल्याचं सांगितलं जातं. अविनाश भोसले यांना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (26 मे) सीबीआयच्या बीकेसी कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर सायंकाळी त्यांना अटक करण्यात आली होती.

अविनाश भोसलेंच्या वकिलांचा युक्तीवाद
या प्रकरणी तपासयंत्रणेनं आरोपपत्र दाखल झालंय, आरोप निश्चित झालेत. त्यामुळे आता नव्यानं यात कुणालाही अटक करता येणार नाही. या प्रकरणाच्या चौकशीत नव्यानं समोर आलेल्या माहितीनुसार ही अटक करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की, यात अनेक माहिती नसलेल्या आरोपींचा समावेश आहे. त्यामुळे या कारवाईला आव्हान देता येणार नाही. हायकोर्टानं या खटल्याला 13  जूनपर्यंत स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे सत्र न्यायालयानं यावर पुढील सुनावणी 20 जूनला घेण्याचं निश्चित केलंय. तोपर्यंत यात नव्यानं रिमांडही घेता येणार नाही. 

30 एप्रिल रोजी अविनाश भोसले यांच्या घरी आणि अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडशी संबंधित असलेल्या ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती. मुंबई आणि पुण्यातील 8 ठिकाणी ही छापेमारी झाली होती. व्यावसायिक आणि रेडियस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संजय छाब्रिया यांना येस बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केली होती. या अटकेशी संबंधित ही छापेमारी होती.

अविनाश भोसले यांना अटक प्रकरण काय?
- येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी ईडी, सीबीआयकडून याआधी चौकशी
- 2018 साली एप्रिल ते जून दरम्यान हजारो कोटी रुपये एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वळते करण्यात आले
- वाधवान यांना येस बँकेकडून कर्ज मिळवून दिल्याचा आरोप
- सीबीआयच्या मते यात मोठ्या उद्योजकांच्या कंपन्यांचा समावेश होता
- बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, चित्रपट निर्माते संजय छाब्रिया, बलवा आणि गोएंका यांचा समावेश
- ईडीकडून याआधी अविनाश भोसले यांची 40 कोटींची संपत्ती जप्त

कोण आहेत अविनाश भोसले?
अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. रिअल इस्टेट किंग अशीही त्यांची ओळख आहे. अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. कोट्यवधी रूपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत. आता बांधकाम क्षेत्राशी संबंधित शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर झालेली कारवाई ताजी असतानाच ईडीने भोसले यांच्यावरही कारवाईचे पाऊल उचलल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑगस्ट 2026 | शनिवार
Gadchiroli Accident News: आई-वडील शेतातील कामात व्यस्त; आंघोळीसाठी नदीवर गेले अन्...; पाण्याचा अंदाज न आल्याने ३ चिमुकल्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
आई-वडील शेतातील कामात व्यस्त; आंघोळीसाठी नदीवर गेले अन्...; पाण्याचा अंदाज न आल्याने ३ चिमुकल्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
Jalgaon Rain: पाच तास झाडावर जीव मुठीत धरून बसले; नाग झाडावर चढताच फांद्या तोडून खाली फेकले; जळगावात पुरात अडकलेल्या नागरिकाने सांगितला थरारक अनुभव
पाच तास झाडावर जीव मुठीत धरून बसले; नाग झाडावर चढताच फांद्या तोडून खाली फेकले; जळगावात पुरात अडकलेल्या नागरिकाने सांगितला थरारक अनुभव

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget