एक्स्प्लोर
तृप्ती देसाईंविरोधात पुण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा
![तृप्ती देसाईंविरोधात पुण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा Pune Atrocity Against Trupti Desai तृप्ती देसाईंविरोधात पुण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/06115223/Trupti-Desai.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या पतीविरोधात हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यक्तीला मारहाण करुन त्याच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप तृप्ती देसाई आणि त्यांच्या पतीवर आहे.
काय आहे प्रकरण?
27 जून 2017 सकाळी 11:30 वाजता बालेवाडी येथील व्हीनस ग्रॅनाईडजवळ होंडा अमेज गाडीत तृप्ती देसाई सोबत जात होते. तेव्हा प्रशांत देसाई, सतीश देसाई, कांतीलाल गवारे आणि इतर दोघांनी अर्टिगा गाडीतून येऊन तक्रारदार विजय मकासरे (वय 33 वर्ष) यांच्यासमोर गाडी आडवी घातली. गाडी थांबवायला सांगून तृप्ती देसाईसह सर्वांनी लाकडी दांडक्याने आणि लोखंडी रॉडने मारहाण केली, असं विजय मकासरे यांनी सागितलं..
प्रशांत देसाई यांनी गळ्यातील सव्वा तोळ्याची सोन्याची चैन आणि 27 हजार रुपये काढून घेतले. तसंच तृप्ती देसाई यांनी आमच्याविरोधात गेलास तर तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करेन, अशी धमकी दिली आणि जातीवाचक शब्दांचा वापर केला, असा आरोप विजय मकासरे यांनी केला आहे.
दरम्यान, हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये तृप्ती देसाई आणि प्रशांत देसाई यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी, रस्ता अडवणे, मारहाण करणे, धमकी देणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
ठाणे
क्राईम
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)