एक्स्प्लोर
पुण्यात 14 मांजरी, सात कुत्र्यांची विष पाजून हत्या
पुण्यात येरवडा परिसरातील त्रिदल हाऊसिंग सोसायटीत 28 डिसेंबर ते 8 जानेवारीच्या काळात 14 मांजरी, सात कुत्र्यांची विष पाजून हत्या करण्यात आली
पुणे : पुण्यात अत्यंत निर्घृणपणे पाळीव कुत्रे आणि मांजरांवर विषप्रयोग करण्यात आला. 14 मांजर आणि सात कुत्र्यांना विष पाजल्याने मृत्युमुखी पडले. येरवडा परिसरातील त्रिदल हाऊसिंग सोसायटीत 28 डिसेंबर ते 8 जानेवारीच्या काळात हे कुत्रे-मांजरी मृतावस्थेत आढळले आहेत.
मुक्या प्राण्यांच्या सामूहिक हत्येने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. मृत्युमुखी पडलेल्या 14 पाळीव मांजरांपैकी एका वर्षापेक्षा कमी वयाची सहा पिल्लं होती. पोलिसात गुन्हा नोंद करण्याची मागणी प्राणीमित्र करत आहेत.
या प्रकारानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पाळीव प्राण्यांना विकृत मानसिकतेतून जीवे मारण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. येरवडा पोलिसात तक्रार देऊनही त्याची दखल घेतली गेली नाही. 14 वर्षांपूर्वी असा प्रकार याच सोसायटीत झाला होता.
'आमच्या सोसायटीत अनेक प्राणी आहेत. त्यांचा कोणाला त्रास होत नाही. मात्र कोणीतरी हा प्रकार केला आहे. अन्नात विष टाकून त्यांना मारलं आहे. याचा तपास झाला पाहिजे' अशी मागणी सोसायटीतील कुत्रा-मांजराच्या मालकांनी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement