एक्स्प्लोर
सणासुदीच्या काळात ग्राहकांना दिलासा, डाळींचे दर उतरले
मुंबई : मागील वर्षभर डाळीच्या चढ्या दराने हैराण झालेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण घाऊक बाजारात डाळींचे दर उतरल्याने डाळ स्वस्त झाली आहे.
सध्या बाजारात तूरडाळ 83 रुपये, उडीद डाळ 120, मूगडाळ 65, मसूर 65 रुपये प्रतिकिलो दराने मिळत आहे. तर साखरेचा प्रति किलो दर 37 रुपयांवर पोहोचला आहे.
डाळीचं वाढलेलं उत्पन्न, साठेबाजांवर आणलेल्या नियंत्रणाने वर्षभरानंतर का होईना डाळ स्वस्त झाली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात डाळीचे भाव उतरल्याने ग्राहकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
दरम्यान, डाळीचं क्षेत्र 164% वाढल्याने आगामी काळात मुबलक डाळ बाजारात येण्याची शक्यता आहे. मात्र शेतकऱ्यांना डाळीसाठी कमी दर मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे डाळ उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.
डाळ |
2015 चे दर |
2016 चे दर |
तूरडाळ |
120 रुपये |
83 रुपये |
उडीद डाळ |
112 रुपये |
120 रुपये |
मूगडाळ |
93 रुपये |
65 रुपये |
मसूरडाळ |
83 रुपये |
65 रुपये |
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement