एक्स्प्लोर

पबजीमुळे प्रेम जुळलं; नांदेडची अल्पवयीन मुलगी पंजाबला पळून गेली

ऑनलाईन खेळल्या जाणाऱ्या पबजी गेमचे अनेकांना व्यसन लागले आहे. यामुळे अनेकांचे मानसिक संतुलन बिघडल्याचेही प्रकार समोर आले आहेत. मात्र, आता अल्पवयीन मुलं/मुलीही याला बळी पडत आहे. यातूनच नांदेडमधील एक मुलगी थेट पंजाबमध्ये पळून गेल्याची घटना आहे.

नांदेड : पबजीसारखे ऑनलाईन गेम मुलांसाठी व्यसन बनले आहेत. धक्कादायक म्हणजे या ऑनलाईन गेमच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर अवघी 13 वर्षांची शाळकरी मुलगी परराज्यातील युवकासोबत पळून गेल्याचा प्रकार नांदेडमध्ये घडला आहे. ऑनलाईन गेमच्या विळख्यात आता अल्पवयीन मुलं/मुलीही अडकत असल्याने ही चिंतेची बाब बनली आहे. पबजीसारख्या ऑनलाईन गेमचे व्यसन दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ऑनलाईन गेमच्या व्यसनामुळे अनेक युवक वेडसर झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. त्यात आता पालकांना आणखी चिंतेत टाकणारी घटना नांदेडमध्ये समोर आली आहे. ऑनलाईन गेमच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर अवघी 13 वर्षांची शाळकरी मुलगी परराज्यातील युवकाबरोबर पळून गेली. हा ऑनलाइन गेम खेळत असताना इतर स्पर्धकांशी बोलता येतं. त्यामुळे या ऑनलाइन गेमच्या माध्यमातून नांदेडमधील एका 13 वर्षीय तरुणीची पंजाबमधील 19 वर्षीय तरुणाशी ओळख झाली. काही महिन्यापासून गेममुळे ते एकमेकांच्या संपर्कात आले आणि त्याचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले. गेल्या 19 नोंव्हेबरला ती मुलगी युवकासोबत नांदेडहून पंजाबला पळून गेली. शाळेत जाण्यासाठी निघालेली मुलगी घरी परतली नाही, म्हणून पालकांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तंत्रिकदृष्ट्या तपास केला आणि मुलगी ऑनलाइन गेममुळे पंजाब राज्यात पळून गेल्याचे समोर आले. पोलिसांच्या एका पथकाने जाऊन 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि तिला पळवून नेणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. या बाबतीत पालकांनी काळजी घेण्याचे आवाहन यानिमित्ताने पोलिसांनी केले आहे. खास मुलींना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑनलाइन गेम सुरु झाले आहेत. काही भामटे या गेम्सचा वापर करुन मुलींना आपल्या जाळ्यात फसवत आहेत. त्यात नांदेडची घटना सर्वच पालकांना चिंतेत टाकणारी आहे. त्यामुळे आपली मुलं ऑनलाइन गेमच्या व्यसनी तर पडत नाहीत ना? याची काळजी सर्व पालकांनी घेणे गरजेचे आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget