एक्स्प्लोर
Advertisement
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुण्यात मोर्चा
पुणे : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुण्यात मोर्चा काढला. शनिवारवाडा ते विधान भवनापर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर या मोर्चात सहभागी झाले होते.
पुण्यातील विद्यार्थ्यांच्या या मोर्चामुळे शनिवारवाडा आणि पुणे स्टेशन परिसरात मोठी वाहतूककोंडी निर्माण झाली होती. विविध मागण्यांसाठी स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा मोर्चा काढला होता.
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने प्रशासनातील काही जागा कंत्राटी पद्धतीने भरण्याची घोषणा केली होती. त्यामुळेच अलिकडच्या काळात स्पर्धा परीक्षांच्या जाहिराती येत नाहीत. सरकारच्या या धोरणामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. याप्रकरणी सरकारने लवकरात लवकर सरकारी जागांच्या जाहिराती काढाव्यात, अशी मागणी मोर्चावेळी करण्यात आली. सोबतच इतर काही मागण्याही या विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
राजकारण
पुणे
Advertisement