एक्स्प्लोर
शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्यात काळी गुढी उभारुन आंदोलन
मुंबईतील 27 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रखवडल्याचा आरोप शिक्षक परिषदेचा आहे. याच प्रकरणी शिक्षण विभागाचा निषेध करण्यासाठी आज सकाळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या बंगल्यात घुसून काळी गुढी उभारली.

मुंबई : शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रखडवल्याचा निषेध अनोख्या पद्धतीने करण्यात आला. शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्यात घुसून शिक्षक परिषदेने काळी गुढी उभारली.
मुंबईतील 27 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रखवडल्याचा आरोप शिक्षक परिषदेचा आहे. याच प्रकरणी शिक्षण विभागाचा निषेध करण्यासाठी आज सकाळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या बंगल्यात घुसून काळी गुढी उभारली.
शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. शिक्षक परिषदेचे पदाधिकारी सुभाष अंभोरे, बी डी घेरडे, प्रा. नरेंद्र पाठक व अन्य कार्यकर्तेही उपस्थित होते. विनोद तावडे यांच्या बंगल्यात घुसून मुख्य दरवाज्यात काळी गुढी उभारून आपला निषेध व्यक्त केला आणि तावडेंकडे काळी गुढी सुपूर्द केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज