एक्स्प्लोर
राज्यातील सुमारे 25 हजार प्राध्यापकांचं बेमुदत ‘कामबंद’
प्राध्यापक आजपासून महविद्यालयात येतील, पण कोणतेही काम करणार नाहीत.
मुंबई : विविध मागण्यांसाठी राज्यातील प्राध्यापकांनी आक्रमक रुप धारण केलंय. राज्यभरातील सुमारे 25 हजार प्राध्यापक आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु करणार आहेत. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरुच राहणार असल्याचा इशारा महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने दिलाय.
40 टक्के रिक्त जागा त्वरित भराव्यात आणि 7 वा वेतन लागू करावा, यासह नऊ मागण्यांसाठी प्राध्यापकांनी कामबंद आंदोलन पुकारलंय. प्राध्यापक आजपासून महविद्यालयात येतील, पण कोणतेही काम करणार नाहीत. मात्र ज्या महविद्यालयात परीक्षा सुरु आहेत, त्या नियमित पार पडतील.
दरम्यान, या मागण्यांबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत उद्या दुपारी 3 वाजता बैठक होणार असून, जोपर्यंत लिखित स्वरुपात मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवणार आहेत.
प्राध्यापकांच्या काही प्रमुख मागण्या :
1. शिक्षकांच्या रिक्त जागा तातडीने भराव्यात.
2. 71 दिवसांचा पगार तातडीने द्यावा.
3. सातव्या वेतन आयोगाची तातडीने लागू करावा.
4. DCPS बरखास्त करुन, जुनी पेन्शन योजना आणखी वाढवावी.
5. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे 'इक्वल पे फॉर इक्वल वर्क' हे तत्वाची अंमलबजावणी करावी.
6. सहाव्या वेतन आयोगातील विसंगती दूर कराव्यात.
7. यूजीसीच्या नियमांप्रमाणे सर्व शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवावे.
8. उच्च शिक्षण कार्यालयाच्या सहसंचालक आणि संचालकांचा मनमानी कारभार थांबवावा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement