एक्स्प्लोर
ऐन सणासुदीत खासगी बसचे दर वाढले!
खासगी बसवाल्यांकडून 30 ते 40 % जास्त पैसे घेण्यात येत आहेत.
मुंबई : दरवर्षी अनेक जण गणेशोत्सवादरम्यान जेव्हा कोकणात किंवा आपआपल्या गावी जायला निघतात. तेव्हा खरं तर बस आणि रेल्वेवर दरवर्षी ताण येतो. म्हणून यावर्षी कोकणासाठी व राज्यातील इतर काही भागात जादाच्या बस आणि रेल्वे सोडण्यात आल्या. तरीही बुकिंग फुल असल्याने प्रवाशांना आता खासगी बसचा पर्याय निवडावा लागतो आहे.
आता याच संधीचा फायदा घेऊन खासगी बस प्रवाशांना जादाचे भाडे लावत असल्याने एकप्रकारे प्रवाशांची ऐन सणासुदीच्या काळात खिशाला कात्री लागत आहे.
खरं तर गणेशउत्सवात मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांची संख्या दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जास्त आहे. त्यामुळे जादाचे बस, रेल्वेचं तिकीट अनेकांना मिळत नाही. यावर पर्याय म्हणून अनेक प्रवासी जास्तीचे पैसे भरून खासगी बसने जायचं ठरवत आहेत. या सगळ्यांमध्ये 30 ते 40 % जास्त पैसे खासगी बसवाल्यांकडून घेण्यात येत आहेत.
खासगी बसचे दर किती वाढले आहेत?
- मुंबई ते रत्नागिरी - एसी - 1600 ते 1800 नॉन एसी - 800 ते 1000 रुपये
- मुंबई ते सावंततवाडी - एसी (स्लीपर) -1800 ते 2000 नॉन एसी (सिटिंग)- 1000 ते 1200 रुपये
- मुंबई ते चिपळूण - एसी - 1300 ते 1500 नॉन एसी - 800 ते 1000 रुपये
- मुंबई ते कणकवली - एसी -1600 ते 1800 नॉन एसी - 1000 ते 1200 रुपये
- मुंबई ते गोवा - एसी - 2300 ते 2500 नॉन एसी - 1300 ते 1500 रुपये
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement