एक्स्प्लोर

Prithviraj Chavan: गोडसेनं गोळ्या घालताना धर्म बदलला होता का? हे एनआयएचं अपयश कारण ते अमित शाहांच्या नेतृत्वात काम करतात; पृथ्वीराज चव्हाणांची सडकून टीका

Prithviraj Chavan: महाराष्ट्र पोलिसांनी हा खटला आधी सादर केला होता. महाराष्ट्र पोलीस सक्षम नाही का? खोट्या केसेस रचल्या का? ज्यांनी खटला भरला त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

Prithviraj Chavan: नथुराम गोडसेनं गोळी मारताना धर्म बदललं होता का? दहशतवादी हा गुन्हेगार आहे,  मारेकरी आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे. पहलगाम हल्ला झाल्यानंतर आरोपी सापडले नाहीत, ट्रेन ब्लास्टमध्ये पुरावे सापडले नाहीत म्हणून मुक्त सोडलं.  मालेगावमध्येही तेच झालं. गृहमंत्र्यांनी पुरावे सादर केलेलं नाही. आज एका मागोमाग एक आरोपी सुटत असतील तर गृहमंत्री यांच्या यंत्रणाचं अपयश असल्याची सडकून टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. आज हे नाहीत, तर दुसरं कोणीतरी असेल. आरडीएक्स बाजारात मिळत नाही. महाराष्ट्र पोलिसांनी हा खटला आधी सादर केला होता. महाराष्ट्र पोलीस सक्षम नाही का? खोट्या केसेस रचल्या का? ज्यांनी खटला भरला त्यांच्यावर कारवाई करा, हल्ला कोणीच केला नाही का? साखळी बॉम्ब स्फोट प्रकरणातील निर्णय देखील चुकीचा असून पुरावे सादर झाले नाहीत हे अपयश आहे सरकारचं असल्याची टीका त्यांनी केली. 

निकाल कसा लागणार आहे याची माहिती होती

मालेगाव निकालावर बोलताना ते म्हणाले की, घटना 2008 ची आहे आणि आता अनेक वर्ष झाली खटला चालला. त्या घटनेत कोणीतरी स्फोट केला. स्फोट आपोआप झाला नसून एका मशीदीच्या शेजारी हा स्फोट झाला. निकाल कसा लागणार आहे या सगळ्या प्रकरणाचा याची खात्री होती. ज्या दिशेने तपास चालला त्यामध्ये काही होईल असं वाटलं नव्हतं. न्यायालयाने आपल्या निकालात तेच म्हटल आहे की एनआयएनं पुरावे दिले नसल्यानं सोडलं. जर यांनी बॉम्ब फोडला नाही,  तर कोणी केला, हा कट कोणी केला हे सांगत नसल्याचे ते म्हणाले. 

तोपर्यंत असे निकाल अपेक्षित 

एनआयए अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. मुंबई बॉम्बस्फोटातही घटना कोणीच दोषी नाही. जी माणसं मेली आणि जखमी झाली त्यांना काय सांगणार? अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली जो पर्यंत या यंत्रणा काम करतात तोपर्यंत असे निकाल अपेक्षित आहे. त्यांनी पुढे सांगितले की, भगवा शब्द वापरू नका. भगवा आमच्यासाठी एक राष्ट्रभक्तीचा रंग आहे. ज्ञानेश्वरांचा हा भगवा आहे. दहशतवादाचा जात धर्म नसतो. तो गुन्हेगार असतो निरपराध लोकांचा खून करत असतो.  

मृत्युमुखी पडले त्यांना काय सांगणार?

त्यांनी पुढे सांगितले की, स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी नथुराम गोडसे होता. भाजपने एका जाती धर्मात गुंतवून ठेवलं आहे. आज उत्सवासारखा दिवस साजरा करत आहेत, पण जे मृत्युमुखी पडले त्यांना काय सांगणार? हे एनआएचं हे अपयश आहे. अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली हे काम करतात. आरोपींना शिक्षा झाली नाही कारण एनआयएनं पुरावा सादर केला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या माफीचा काय प्रश्न आहे, मुख्यमंत्री काहीही म्हणतील असे ते म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
NCP : इकडे शरद पवारांसारखे मोठे नेते, तर तिकडे सुनेत्राताई-पार्थ पवार, पण आमच्याशी चर्चा करूनच अंतिम....; राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांची मोठी प्रतिक्रिया
इकडे शरद पवारांसारखे मोठे नेते, तर तिकडे सुनेत्राताई-पार्थ पवार, पण आमच्याशी चर्चा करूनच अंतिम....; राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांची मोठी प्रतिक्रिया
Gokul Election: मागच्या दारानं महायुतीचा गोकुळवर कब्जा, कोल्हापूरपासून बीडपर्यंत संतापाचा उद्रेक, पोस्टर्स लागली; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'साठी सोशल मीडियातून सुद्धा हुंकार भरला
मागच्या दारानं महायुतीचा गोकुळवर कब्जा, कोल्हापूरपासून बीडपर्यंत संतापाचा उद्रेक, पोस्टर्स लागली; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'साठी सोशल मीडियातून सुद्धा हुंकार भरला

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget