(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Konkan Railway : कोकण रेल्वेचं विद्युतीकरण 100 टक्के पूर्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा
Konkan Railway : कोकण रेल्वेने विद्युतीकरण आणि दुपदरीकरणाच्या कामाचा वेग कायम ठेवत काम पूर्ण केले आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या कोकण रेल्वेचा वेग आणखी वाढला आहे. कोकण रेल्वेचे विद्युतीकरणाचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले आहे. विद्युतीकरणानंतर आता कोकण रेल्वेतील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि जलद होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाच नॅशनल हायवे प्रकल्प, सात रेल्वे प्रक्लपांचे लोकार्पण करण्यात आले आहे. कोकण रेल्वेचा मार्ग हा खूपच आव्हानात्मक मानला जातो. याच्या वाटेवर अनेक दर्या आहेत ज्यात उतार आहेत आणि तिचा रेल्वेमार्ग अनेक वळणदार वाटांमधून जातो. अशा आव्हानांनी भरलेल्या रेल्वे मार्गातील विद्युतीकरणाचे काम गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित होते. मात्र आता त्याचे शंभर टक्के विद्युतीकरण झाल्याने या रेल्वे मार्गावरील प्रवास अधिक वेगाने करता येणार आहे.
कोकण रेल्वेने विद्युतीकरण आणि दुपदरीकरणाच्या कामाचा वेग कायम ठेवत काम पूर्ण केले आहे. यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी तसेच रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांनी देखील कोकण रेल्वेच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
कर्नाटका में 5 नेशनल हाईवे प्रोजेक्ट्स, 7 रेलवे प्रोजेक्ट्स का शिलान्यास किया गया है।
— PMO India (@PMOIndia) June 20, 2022
कोंकण रेलवे के शतप्रतिशत बिजलीकरण के महत्वपूर्ण पड़ाव के हम साक्षी बने हैं।
ये सभी प्रोजेक्ट कर्नाटका के युवाओं, मध्यम वर्ग, किसानों, श्रमिकों, उद्यमियों को नई सुविधा देंगे, नए अवसर देंगे: PM
रेल्वे मंत्रालयाने 2016 रोजी कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाला मंजुरी दिली होती. रत्नागिरी ते थिविम यादरम्यान विद्युतीकरण पूर्ण झाल्याने कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या 741 किलोमीटर मार्गांवर विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. या विद्युतीकरणासाठी एकूण 1287 कोटीं रुपये खर्च करण्यात आले आहे. कोकण रेल्वेवर विद्युतीकरण झाले नसल्याने डिझेल इंजिनाच्या मदतीने या मार्गावर रेल्वे वाहतूक होत असे. साधारणपणे 12 डब्यांच्या रेल्वेगाडीला एक किलोमीटर अंतर कापण्यासाठी 6 ते 10 लिटर डिझेलची आवश्यकता असते. इंजिनाच्या अश्वशक्ती क्षमतेनुसार यात बदल होतो. आता, विद्युतीकरण झाल्यामुलळे इंधनाची बचत होणार असून प्रवाशांना वेगवान आणि प्रदूषणमुक्त वातावरणात प्रवास करणे शक्य होणार आहे.