एक्स्प्लोर

जर्मनीत डॉक्टर असल्याचे भासवले; सांगलीतील तरुणाचा मुंबईतील वकील महिलेला 15 लाखांचा गंडा

विटा जवळील लेंगरे गावातील वैभव शिंदे गावात बसून मुंबईतील एका महिलेला जर्मनीत डॉक्टर आहे असे भासवून जवळपास 15 लाखाला गंडा घातलाय.

सांगली : जर्मनीत डॉक्टर असल्याचे सांगत सोशल मीडियाच्या माध्यमातून एका महिलेची 15 लाख रुपयांची फसवणूक चक्क ग्रामीण भागात राहणाऱ्या एका तरुणाने केल्याचा प्रकार घडलाय. सांगली जिल्ह्यातील विटा जवळील लेंगरे गावातील एका तरुणाने हा प्रताप केला असून पैशाची फसवणूक झालेली महिला मुंबईची आहे. वैभव शिंदे (वय 29) असे तरुणाचे नाव असून सदर महिलेच्या तक्रारीनंतर तरुणांविरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विटा पोलिसानी देखील लगेच त्या तरुणास अटक केलीय. फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या तरुणाने भारत जाधव या नावाने अकाउंट बनवले होते. या अकाउंटच्या माध्यमातून या तरुणाने सदर सोशल मीडियावर महिलेशी ओळख वाढवून नंतर पुढे फसवणूक केलीय. या घटनांमुळे फेसबुक किंवा अन्य सोशल मीडियावरून केल्या जात असलेल्या फसवणुकीचे प्रकार वाढत चालले असल्याचे दिसून येत आहे. 

विटा जवळील लेंगरे गावातील वैभव शिंदे गावात बसून मुंबईतील एका महिलेला जर्मनीत डॉक्टर आहे असे भासवून जवळपास 15 लाखाला गंडा घातलाय. कोरोनाचा प्रादुर्भाव 2020 मध्ये महाराष्ट्रमध्ये होऊ लागला आणि शहरे लॉकडाऊन होऊ लागली. त्यामुळे लोकाना घराच्या बाहेर पडता येईना आणि लोक घरात अडकून पडली. त्यामुळे या काळात आधार होता तो मोबाइलचा. वैभवला देखील त्या लॉकडाऊन काळात मोबाईलचाच आधार होता. त्यामुळे त्या काळात वैभवने  फेसबुक आणि इन्स्टाग्राम वर शक्कल लढवत भरत जाधव या नावाने खोटे अकाउंट काढले. परदेशात राहतोय असे भासावे म्हणून मॉडेल वाटावा अशा तरुणाचा फोटो त्याने  फेसबूक , इंस्टाग्राम वर लावला. मग सुरू केल्या धडाधड फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायला.
यातील एक  फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली मुंबईतील एका महिला वकीलाला पाठवली. फेसबुक आणि इन्स्टंग्राम या या सोशल मीडियावर वैभव शिंदे याने त्याच्या प्रोफाईलमध्ये तो जर्मनी या देशात डॉक्टर व्यवसाय करत असल्याची खोटी माहिती दिली होती.

मुंबईतील या वकील महिलेने वैभवने बनवलेल्या अकाउंट वर चॅटिंग सुरू केले. कधी हिंदी, कधी मराठीत चॅटकरून वैभव शिंदे याने त्या महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वैभवने आपला मोबाईल क्रमांक महिला वकिलाशी चॅटद्वारे शेअर केला. त्यानंतर व्हट्सअपच्या माध्यमातूनही या दोघांचे चॅटिंग सुरू झाले. व्हॉटसअप द्वारे मसेजेस, फोन कॉल करुन आणखी विश्वास संपादन केला. तसेच अनेक वेळा तिच्याशी त्याने भावनिक गप्पा मारल्याने सलगी वाढत गेली. मात्र यादरम्यान वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून या महिला वकिलाकडून वैभव शिंदेने वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून तब्बल १४ लाख ९२ हजार रुपये घेतले. ही रक्कम महिला वकिलांकडून घेताना त्याने आपली आई कोरोनाने आजारी आहे. आपले वडील आजारी आहेत. चुलते वारलेत, बहिणीच्या नव-याची प्रकृती गंभीर आहे. आपण भारतात येण्यासाठी निघतोय परंतु आपले कोणीतरी पाकीट मारले आहे. त्यात क्रेडिट कार्डस, डेबिट कार्डस होती. तिकडे आल्यानंतर तुमची रक्कम बँकेच्या माध्यमातून ट्रान्सफर करतो अशा बतावण्या त्याने केल्या. परिणामी या सर्व गोष्टी आपल्याला खऱ्या वाटल्याने आपण पैसे दिले असे संबंधित महिला वकीलाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अखेरीस ७ जूनला वैभव शिंदे याने अचानक सोशल मीडियावरची आपली भारत जाधव.नावाने काढलेली सगळी अकाऊंटस डीअक्टिव्हेट केली. आपली फसवणूक झाल्याचे कळताच वकील महिलेने सायबर क्राईम विभागाशी संपर्क साधला. तसेच या संबंधित भरत जाधव म्हणजेच वैभव शिंदे याचा मोबाईल क्रमांक जो त्याने व्हॉट्सऍपसाठी वापरला होता तो क्रमांक दिला. त्यावरून संबंधित नंबर सांगली जिल्ह्यातील लेंगरे गावातील वैभव शिंदे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तत्काळ या वकील महिलेने विटा पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. पोलिस निरीक्षक संतोष डोके यांना घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली. शिवाय दोघांमधील संभाषणाचे आणि वैभव शिंदे यांना वेळोवेळी पैसे दिल्याचे पुरावे दिले. त्यावरून वैभव शिंदे याच्या विरोधात भारतीय दंड संविधान कलम कायदा 420, 465, 415, 419, तंत्रज्ञान अधिनियम 2000 कलम 66, 66 ड प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला अटकही करण्यात आली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आतापर्यंत विविध पद्धतीने फसवणूक होत आली आहे. लॉकडाऊन काळात तर मोबाइल हाच लोकांचा जास्त आधार आणि कामाचे साधन बनलल्याने फेसबुक किंवा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आधी अडकवणे आणि नंतर पैशासाठी ब्लॅकमेल केल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे नागरिकांनि खूप सावधान पध्दतीने सोशल।मीडिया हाताळावा असे आवाहन सायबर क्राइम विभाग करत आहे. केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे आता सोशल मिडिया देखील डोळयांत तेल घालून हाताळने गरजेचं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू, मंदिरात येणाऱ्यांनी अंगभर कपडे घालावेABP Majha Headlines : 04 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAnjali Damania : दिवसभरात Dhananjay Munde यांचा राजीनामा घ्या, नाही तर जनहित याचिका दाखल करुAnil Parab PC : मी चौकशीला सामोरं जायला तयार; झीशान सिद्दिकींना अनिल परबांचं उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
Dombivli Crime: अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
Anil parab मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबांचा इशारा
मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबांचा इशारा
Video: अंजली दमानियांची भेट, राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी उत्तर टाळलं; माध्यमांनाही लक्ष्य केल
Video: अंजली दमानियांची भेट, राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी उत्तर टाळलं; माध्यमांनाही लक्ष्य केल
Embed widget