एक्स्प्लोर
यवतमाळ, परभणीत मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा, वादळी वाऱ्यामुळे घराचे पत्रे उडाले, पंधरा जण गंभीर जखमी तर तिघांची प्रकृती गंभीर
घरांवरील उडालेले हे पत्रे गावकऱ्यांना लागल्यामुळे अनेक जनावरांनाही या पत्र्यांचा मार लागलाय.
परभणी : राज्यात उकाड्याने त्रस्त झालेल्या जनतेला मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी काहीसा दिलासा मिळाला आहे. परभणीच्या पूर्णा तालुक्यात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक घरांवरील पत्रे उडुन गेले आहेत. यात जवळपास पंधरा जण जखमी झाले असून यातील तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
तर यवतमाळ जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसामे जिल्ह्याच्या काही भागात जोरदार हजेरी लावली. वादळी वारा आणि पावसाने जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यात मोठं नुकसान केलं. घाटंजी तालुक्यातीलदत्तपुर येथील जिल्हा परिषद शाळेचे छत सुद्धा कोसळले.
VIDEO | सोलापूर, वाशिम, चंद्रपूरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस | एबीपी माझा
काल रात्री परभणीसह पुर्णा, पालम तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पाऊस,विजांचा गडगडाट आणि वादळी वारे सुटल्यामुळे पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी, पिंपळगाव बाळापुर या दोन गावांना मोठा फटका बसला आहे. या दोन्ही गावांच्या घरांवरील पत्रे उडाले आहेत.
घरांवरील उडालेले हे पत्रे गावकऱ्यांना लागल्यामुळे अनेक जनावरांनाही या पत्र्यांचा मार लागलाय. या संपुर्ण घटनेत एकूण 15 जणांसह अनेक जनावरे जखमी झाली आहेत. यातील 12 जणांवर पुर्णा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पिंपळगाव बाळापूर येथील सुमनबाई रेंनगडे,सरस्वती रेनगडे आणि आणि देवराव रेनगडे या तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान वादळी वाऱ्याचा फटका या गावकऱ्यांना बसल्याने एकीकडे गावकरी जखमी झाले आहेत तर दुसरीकडे याच गावकऱ्यांचा संसार ही उघड्यावर आला आहे.
State News Bulletin | बातम्या सुपरफास्ट | राज्यभरातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा | एबीपी माझा
संबंधित बातम्या
मान्सून श्रीलंकेत दाखल, मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात पुढील 48 तास मान्सून पूर्व पावसाची शक्यता
राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी, उकाड्याने त्रस्त नागरिकांना काही प्रमाणात दिलासा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement