एक्स्प्लोर
पुढील दोन दिवस राज्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता, काही भागात उष्णतेची लाट कायम, हवामान विभागाचा अंदाज
महाराष्ट्रासह देशभरात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. तसेच राज्यातल्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. तसेच राज्यातल्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भातल्या बहुतेक जिल्ह्यांत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, ढगाळ स्थितीमुळे मुंबईतल्या तापमानातही किमान 1 अंशांनी वाढ झाली असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून घामाघूम करणाऱ्या उष्णतेपासून विदर्भातील काही भागांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शनिवारी नागपुरात काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांना दिलासा मिळाला होता.
यंदा पर्जन्यमान समाधानकारक राहील, हवामान खात्याचा दुसरा अंदाज
3 आणि 4 जून रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने सांगितले आहे. तसेच मराठवाड्यात हवामान कोरडे राहील, असेही म्हटले आहे. 5 जून रोजी कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. 6 जून रोजी कोकण, गोव्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असे हवामान खात्याने म्हटले आहे.
येत्या 10 जूनपर्यंत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता | ABP Majha
मान्सून चार जूनपर्यंत केरळमध्ये, महाराष्ट्रातही मान्सून उशिराने येण्याची शक्यता
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement